Rain 
सोलापूर

नरखेडचे 70 व डिकसळच्या 100 हून अधिक कुटुंबांचे तात्पूरते स्थलांतर

गो.रा. कुंभार

नरखेड (सोलापूर) : येथील भोगावती नदीला महापूर आला आहे. गावाच्या पूर्वेकडील 70 हून अधिक घरात पाणी शिरले आहे. या कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे, अशी माहिती ग्रामसेवक तात्या नाईकनवरे यांनी दिली.
 
उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे, बार्शी तालुक्‍यातील भोगावती, नागझरी व चांदणी या नद्यांना महापूर आला आहे. या नद्यांवर असणारे बार्शी तालुक्‍यातील सर्व मध्यम प्रकल्प व मोठे पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. याचाच दुष्परिणाम मोहोळ तालुक्‍यातील भोगावती नदीकाठच्या गावांना सहन करावा लागत आहे. नदीकाठच्या गाव कुसात असणाऱ्या गावातील कुटुंबांना सावधगिरीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

नरखेड येथे भोगावती नदीपात्र जवळ असणाऱ्या 70 ते 80 कुटुंबांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात येत आहे. नरखेड येथे भोगावती नदीचा पूर रात्री उशिरापर्यंत सिध्देश्वर मंदिरापर्यंत आला होता. नदीपात्रात जवळील काही कुटुंबांनी रात्रभर जागी राहण्याची वेळ आली. दोन दिवस पुराचा धोका कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थ व प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा पूर नियंत्रण अशक्‍य आहे. डिकसळ निम्म्या गावात पाणी शिरले आहे. 20 कुटुंब पाण्यात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 100 कुटुंबाचे तात्पुरते स्थलांतर केल्याची माहिती माजी सरपंच गोविंद पाटील यांनी सांगितले. 

भोगावती नदीला पूर नियंत्रण रेषाच नाही 

भोगावती नदी पात्रात भोगावती, नागझरी चांदणी व उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ तालुक्‍यातील नदी परिसरातील ओढ्यांचे पाणी भोगावती नदीमध्ये  येते. त्यामुळे नदीला महापूर प्रत्येक वर्षी येतो. परंतू शासनाच्यावतीने अद्याप पूरनियंत्रण रेषा निश्‍चित केली नाही. तर काही ग्रामस्थ नदीपात्राच्या  जवळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत वास्तव्यास आहेत, परंतु भोगावती नदीला पूर नियंत्रण रेषा केले असती तर ही दुर्दैवी वेळ आली नसती.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT