KCR in Maharashtra Esakal
सोलापूर

KCR in Maharashtra: बीआरएसचे गुलाबी वादळ पोहचले खेडोपाडी! ५० गावच्या सरपंच उपसरपंचांचा प्रवेश,भाजपला मोठा धक्का

दक्षिण सोलापूर, अक्कलकोटमध्ये भाजपला मोठं खिंडार

सकाळ डिजिटल टीम

आषाढीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आलेले गुलाबी वादळ आज माजीमंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात घोंगावत आले. मतदारसंघातील दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्त्यांनी आज हैदराबाद येथे बीआरएस पक्षात प्रवेश केला. यामुळे दक्षिण सोलापूर मतदार संघात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

आज सकाळी दक्षिण सोलापूर मतदारसंघातील जवळपास चाळीस गाड्यांचा ताफा हैदराबादकडे रवाना झाला. यामध्ये अनेक गावचे आज-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा व तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित या सर्वांनी काल (ता. ७) बीआरएसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे समन्वयक नागेश वल्याळ व सचिन सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश होत आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघावर नेहमी धनगर समाजाचे प्राबल्य राहिले आहे. त्या दृष्टीकोनातून बीआरएसच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही उमेदवारीचा आग्रह धरणार आहे. या मतदारसंघात पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी आम्ही प्रयत्न करणार असून येत्या महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुका बीआरएसच्या माध्यमातून लढवल्या जातील, असे सचिन सोनटक्के यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत भाजपसमोर आव्हान

प्रवेश करणाऱ्यामध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लोकांचाही समावेश आहे. अल्पसंख्याक जातींना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. या पक्षप्रवेशामुळे प्रस्थापित पक्षांना फटका बसणार हे निश्चित समजले जाते.

यापूर्वी धनगर समाजाचे नेते स्वर्गीय दुग्ध विकास मंत्री आनंदराव देवकते यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर बाळासाहेब शेळके यांनी राष्ट्रवादीकडून एकदा प्रयत्न केला होता पण यश आले नाही. मागील तीन निवडणुकीत हा समाज भाजपच्या पाठीमागे उभा होता. येत्या विधानसभा निवडणुकीत या समाजाचा उमेदवार राहिल्यास दक्षिण व अक्कलकोट दोन्ही मतदारसंघात भाजपला अडचणीचे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT