ONLINE EDUCATION 
सोलापूर

मोठी ब्रेकींग..! दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाला कात्री; दोन कोटी विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाइन धडे

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदा शाळांची घंटा उशिरा वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आकाशवाणी व दूरचित्रवाणीवरून शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, त्याची मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, बालभारती व राज्य माध्यमिक मंडळ यांच्या नियोजनानुसार अनावश्यक पाठ्यांश कमी करून परीक्षेसाठी व आगामी शैक्षणिक वर्षासाठी महत्त्वाचा असलेलाच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे.


राज्यात दोन कोटी 25 लाख विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सुमारे 1 कोटी 90 लाख विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून पोहोचण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. परंतु केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने दूरदर्शन वरील 16 मोफत चॅनेलपैकी कोणते चॅनेल ऑनलाईन शिक्षणासाठी द्यायचे आणि त्याची वेळ कोणती असेल, याबाबत अद्यापही निर्णय दिलेला नाही. दरम्यान, ऑनलाईन शिक्षणाच्या आधारावर यंदाही 15 जून पासून शाळा सुरू होतील असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. ऑनलाइन शिक्षणाचे अकॅडमिक कॅलेंडरही तयार करण्यात आले असून विदर्भात 26 जूनपासून तर पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रामध्ये 15 जूनपासून या प्रयोगाला सुरुवात होईल, असा विश्वास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्यक्त केला आहे. परीक्षेला न येणारा अथवा आगामी शैक्षणिक वर्षात फायदेशीर ठरणाऱ्या पाठ्यक्रमाला बगल दिली जाणार आहे. याचवेळी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा विषयांच्या तुलनेत विज्ञान, गणित, यासह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे.



'डीडी'चे 16 चॅनल फ्री दिसणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आणि जिल्हाबंदी आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या दूरदर्शन या वाहिनीवरील 16 चॅनेल मोफत पाहायला मिळतात. मात्र, बहुतांश कुटुंबांकडे दूरदर्शनचे डिश नसल्याने अन्य डिशच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना या नव्या प्रयोगाचा लाभ घेता येईल, यासाठी केंद्रीय दूरसंचार व प्रसारण मंत्र्यांकडे परवानगी मागितली आहे. मोफत दिसणाऱ्या डीडीच्या 16 चॅनलपैकी काही मोजक्या चॅनलवर पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. गरज भासल्यास काही विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून लाईव्ह तास घेतले जाणार आहेत.

अत्यावश्यक विषयांना विशेष प्राधान्य; एक हजार तासांचे मटेरियल 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासरुममधून टिव्ही चॅनलद्वारे शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्याचे अकॅडमिक कैलेंडर तयार केले असून एक हजार तासांचे मटेरियल तयार ठेवले आहे. गरज भासल्यास विद्यार्थ्यांना विशेषकरून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना थेट दूरचित्रवाणीच्या माध्यमातून धडे देण्याचे नियोजन आहे. अत्यावश्यक विषयांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. जो अभ्यासक्रम शिकवण्याची गरज नाही, अशा अभ्यासक्रमातील शंका विद्यार्थी संबंधित विषय शिक्षकांना विचारू शकतात असेही नियोजन केले आहे.

- विकास गरड, उपसंचालक, आयटी सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावकरांचा श्वास कोंडला! महामार्गावर धुळीचे लोट, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे बोट

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Latest Marathi News Live Update : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची बंगळुरूत धडक कारवाई

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

SCROLL FOR NEXT