shri vitthal rukmini temple  esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

याआधी पूजा सुरू असताना ४ तासांसाठी दर्शन बंद करण्यात येत होते

अंकिता खाणे (Ankita Khane)

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन सुरूच असणार आहे.

याआधी शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे आलेल्या लाखों वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत असे. रांगेतला कालावधी चार तासांनी वाढायचा. त्यामुळे वारकऱ्यांना आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी फार वेळ लागत असे ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे.

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानासुद्धा देखील मुखदर्शन सुरू राहणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री बैठकीत याबाबतची माहिती दिली आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत ही शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो.

या निर्णयामुळे जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार आहे. आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळावं यासाठी 30-30 तास भाविक दर्शन रांगेत उभे असतात. त्याचवेळी राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारने एक धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT