post-office-schemes 
सोलापूर

टपाल खात्याचा मोठा निर्णय : ज्येष्ठांसह दिव्यांगांना घरपोच रक्‍कम 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना या विषाणूचा संसर्ग खंडीत करण्याच्या हेतूने गर्दी होऊ नये म्हणून देशभर लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्‍तींना बॅंकांमध्ये अथवा टपाल कार्यालयात येणे मुश्‍लिक आहे. त्यांना आता पोस्टमनद्वारे घरबसल्या पाच हजार रुपयांची रक्‍कम दिली जाणार आहे. 


शहर-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्‍ती व ज्येष्ठ नागरिकांनी घरबसल्या पाच हजार रुपयांची रक्‍कम प्राप्त करुन घेण्यासाठी 0217- 2726513 या क्रमांकावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संपर्क करावा, असे आवाहन टपाल कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कोणाच्याही आधाराविना घराबाहेर पडणे अशक्‍य असलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी टपाल विभागाने ही सेवा देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे त्यांची चांगल सोय झाली असून त्यांना आता बॅंकेतून पैसे काढण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असा विश्‍वास सोलापूर टपाल कार्यालयाचे मुख्य अधिक्षक एस. एस. शिरसी यांनी व्यक्‍त केला. 


यांना मिळणार घरपोच पाच हजार रुपये 

  • शहर-जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक अथवा दिव्यांग व्यक्‍ती 
  • टपाल विभागाशी संबंधित इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत असावे खाते 
  • कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेतील खातेदारांना घरबसल्या सेवा 
  • खात्यात रक्‍कम शिल्लक असावी : आधार व मोबाइल लिंक आवश्‍यक 


खात्यावर रक्‍कम असल्यास मिळणार पाच हजार 
लॉकडाउनमुळे देशभर संचारबंदी लागू असल्याने टपाल खातेदारांना घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग खातेदारांना टपाल कार्यालयाच्या माध्यमातून घरपोच पाच हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, त्यांच्या खात्यात शिल्लक रक्‍कम असायला हवी. 
- एस. एस. शिरसी, मुख्य अधीक्षक, टपाल, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण मिळालं तरी कसं? बघा संपुर्ण इतिहास

पत्राच्या घरापासून सुरुवात; आज हक्काच्या घरात गृहप्रवेश, पण सुख पाहायला बहीण नाही, लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची पोस्ट चर्चेत

Leopard Attack: दूध घालून परतताना उसातून बिबट्याची झेप! दुचाकीस्वार शेतकऱ्याने हल्ला चुकवत वाचवला जीव, बिबट्याच्या हल्ल्याने थरकाप..

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT