crime1.jpg 
सोलापूर

मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्यांना पकडले जाळ्यात अन पुढे झाले भलतेच....

सकाळ वृत्तसेवा

विजयपूरः एका मोठ्या चोरीच्या तपासात आलमेल (जि.विजयपूर) पोलिसांनी तीन संशयीतांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. मात्र तपासणीमध्ये तीन संशयितापैकी दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे या कारवाईत सहभागी झालेल्या दोन पोलिस उपनिरिक्षकासह एकूण 39 पोलिस शिपायांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

दोन दिवसांपूर्वी आलमेल पोलिसांनी तीन संशयीतांना सोने चोरीप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या आरोपींना हिरेबेवनूर गावाजवळ अटक केली होती. त्यानंतर सिंदगी येथे या संशयीतांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तपासणीच्या वेळी या संशयितांची कोविड-19 स्वॅब टेस्ट पण केली होती. यानंतर या संशयीतांची विजयपूरच्या दर्गा जेलमध्ये रवानगी केली होती. आज त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट आले. तीन आरोपींपैकी दोघांना कोरोना झाल्याचे अहवालात म्हंटले आहे. 
तेव्हा रिपोर्ट आल्यानंतर त्या दोन आरोपींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. या आरोपींची चौकशी व कारवाई करणाऱ्या दोन पोलिस उपनिरीक्षक व 37 पोलिस शिपायांची तपासणी करून त्यांचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट पाठविण्यात आले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन केले आहे.

विजयपूरमध्ये आतापर्यंत एकूण नऊ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या प्रकारामुळे पोलिस खात्यात चांगलीच घबराट उडाली आहे. एकूण कोरोना संख्या 247 असून या पैकी 211 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना संसर्गाने सात जण मरण पावले आहेत. अद्याप 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT