लोकअदालत
solapur
तात्या लांडगे
सोलापूर : लोकअदालतीत एकूण एक लाख चार हजार प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी आली होती. त्यातील १८ हजार ६३४ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून वेगवेगळ्या संस्था व विभागांची १०१ कोटी ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे.
सोलापूर जिल्हा न्यायालयासह जिल्हाभरातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (ता. १३) लोकअदालत पार पडली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, जिल्हा न्यायाधीश योगेश राणे, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. व्ही. एन. देशपांडे, ॲड. विनोद कांबळे, महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक संदीप झेडगे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी संजीवकुमार, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक मुकुंद ढोबळे, जिल्हा प्राधिकरणाचे सचिव मल्हार शिंदे, अधीक्षक समशोद्दीन नदाफ, प्राधिकरणाच्या सहायक लोकअभिरक्षक डॉ. देवयाणी किणगी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात लोकअदालत पार पडली. लोकअदालतीत तीन पक्षकारांनी ऑनलाइन तथा व्हॉट्सॲपवरील व्हिडिओ कॉलवरून सहभाग नोंदवला. तत्पूर्वी, जिल्ह्यात ९ ते १२ सप्टेंबरपर्यंत चार हजार ८८७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली होती.
विभक्त झालेले पत्नी-पत्नी पुन्हा एकत्र
पुण्यात व्यावसायिक असलेल्या पतीचे पत्नीसोबत भांडण झाले होते. पत्नी व सासूमध्ये सतत भांडण होत असल्याने पतीने पत्नीला माहेरी हाकलून दिले होते. त्यांना तीन मुले होती. त्यांच्यातील भांडणामुळे मुलांचे हाल होत होते. न्यायाधीश ज्योती पाटील यांनी त्यांच्यात समझोता घडवून आणला. सोलापुरातील एका नामांकित रूग्णालयात पर्यवेक्षक असलेल्या पतीचेही पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी अनेक वर्षांपासून माहेरी होती. त्यांचा जून २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना मुलगा होता. त्यांच्यातही समझोता झाला आणि पत्नी पतीच्या घरी नांदायला गेली. याशिवाय सोलापुरातील तरूणीचा विजयपूर येथील एका तरुणासोबत विवाह झाला होता, पण हुंड्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि पत्नी माहेरी आली होती. त्यांना दोन मुली व एक मुलगा होता, त्यांच्यातही या लोकअदालतीत समझोता झाला.
लोकअदालतीची स्थिती
एकूण प्रकरणे
१,०४,२८९
तडजोडीने मिटलेली प्रकरणे
१८,६३४
तडजोडीतून वसूल रक्कम
१०१.५० कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.