solapur univercity Esakal
सोलापूर

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना आता विद्यापीठातील ‘या’ ५७ अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश; १२०० ते ४० हजार रुपयांच्या शुल्काची बचत, विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

विद्याठातील २९ अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पूर्वीपासून शिष्यवृत्ती मिळत आहे, पण २०११-१२ ते २०२३-२४ या काळात सुरू झालेल्या २८ अभ्यासक्रमांना अजूनपर्यंत शिष्यवृत्ती मिळत नव्हती. कुलगुरू, प्र कुलगुरूंच्या प्रयत्नातून आता या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याला मोफत प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील २८ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यात पदार्थविज्ञान संकुल, संगणकशास्त्र संकुल, जैवविज्ञानशास्त्र संकुल, सामाजिकशास्त्र संकुल, भाषा व वाड;मय संकुल, आरोग्यविज्ञान संकुल, वाणिज्य व व्यवस्थापन संकुल, तंत्रज्ञान संकुल, रसायनशास्त्र संकुल आणि कला व ललित कला संकुल या दहा संकुलातील तब्बल २८ अभ्यासक्रमाला आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे.

विद्याठातील २९ अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पूर्वीपासून शिष्यवृत्ती मिळत आहे, पण २०११-१२ ते २०२३-२४ या काळात सुरू झालेल्या २८ अभ्यासक्रमांना अजूनपर्यंत शिष्यवृत्ती मिळत नव्हती. कुलगुरू, प्र कुलगुरूंच्या प्रयत्नातून आता या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याला मोफत प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विद्यापीठातील संकुलातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन दरवर्षी हजारो विद्यार्थी नोकरी तथा रोजगाराचा मार्ग निवडतात, पण विद्यापीठातील महत्त्वाच्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती नसल्याने त्या विद्यार्थ्यांना बाराशे रुपयांपासून ४० हजार रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागत होते. अनेकांची इच्छा असूनही शुल्क भरायला पैसे नसल्याने त्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नव्हता. आता ही समस्या दूर झाली असून विद्यापीठाच्या संकुलांमधील एकूण ५७ अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश घेता येणार आहे.

‘या’ कोर्सेसला आता शिष्यवृत्ती

एम. एससी. फिजिक्स (कंडेन्सड्‌ मॅटर फिजिक्स व एनर्जी स्टडीज्‌), एम. एससी. बायोस्टॅटिस्टिक्स्‌, एम. एससी. मायक्रोबायोलॉजी, एम. एससी. बायोइन्फोरमॅटिक्स्‌, एम. एससी. बायोटेक्नॉलॉजी, एम. ए. योगा, पीजी डिप्लोमा इन डायटेटिक्स्‌ ॲण्ड न्यूट्रिशन, बी.व्होकेशनल जनॉलिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन, एम. ए. हिस्टोरी, एम. ए. पोलिटिकल सायन्स, एम. ए. पब्लिक ॲडमिनिस्टेशन, एम. ए. सायकोलॉजी, एम. कॉम. (ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी व ॲडव्हान्स्ड बॅकिंग), एम. ए. मराठी, एम. ए. हिंदी, एम. एम. इंग्लिश, एम. एम. संस्कृत, एम. ए. उर्दू, एम. ए. कन्नड, एम. ए. पाली, एम. ए. प्राकृत, इंटिग्रेटेड एम. टेक. कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, एम. ए. म्युझिक, एम. ए. ड्रामॅटिक्स, एम. ए. पखवाज, एम. एससी. मेडिसिनल केमिस्ट्री.

विद्यार्थ्यांना मिळतील मोफत प्रवेश

विद्यापीठातील सर्व संकुलांमधील २०२४-२५ मध्ये २८ अभ्यासक्रमांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला आता मोफत प्रवेश घेता येईल.

- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car-Bike Offers : दसरा-दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ऑफर मिस करू नका! 'या' 5 दुचाकी अन् चारचाकी गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रस्तावित

बॉलिवूडमधील शापित सिनेमा ! दोन दिग्दर्शकांसह मुख्य कलाकारांनी सुद्धा गमावला जीव, सेटवरही घडलेल्या भयावह घटना

Italian Desserts : पास्ता-पिझ्झा सोडा! ‘या’ इटालियन डेझर्ट्सनी जगभरात घातलाय धुमाकूळ!

Latest Marathi News Live Update: पुणे पोलिसांकडून आता निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT