Big statement on MP Mahaswamiji caste certificate 
सोलापूर

महास्वामींचे मोठे वक्तव्य : भाजप खासदार महास्वामींचा जातीचा दाखला मी पाहिला होता

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतच खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व उमेदवारांना बोलावून खासदार महास्वामींचा बेडा जंगम जातीचा दाखला आम्हाला दाखविला असल्याची माहिती श्री व्यंकटेश्‍वर महास्वामी (डी. जी. कटकधोंड) यांनी दिली. खासदार महास्वामींनी या दाखल्याची झेरॉक्‍स प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचे बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य केले आहे. या जागेवर पोटनिवडणूक झाल्यास भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेसकडून कोण लढणार? याची सोलापूरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून ही पोटनिवडणूक लढण्याची इच्छा आणखी एका महास्वामींनी व्यक्त केली आहे. 
एकीकडे पोटनिवडणुकीची चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील अपिलाच्या माध्यमातून खासदार महास्वामी पाच वर्षे काढतील, असा अंदाज बांधला जात आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने सोलापूरच्या संभाव्य पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा रंगत आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चडचण येथील श्री व्यंकटेश्‍वर महास्वामी (डी. जी. कटकधोंड) यांनी हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीने निवडणूकही लढविली होती. हेच महास्वामी आता सोलापूरची पोटनिवडणूक झाल्यास भाजपकडून लढण्याची इच्छा व्यक्त करू लागले आहेत. त्यासाठी कर्नाटकमार्गे दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांशी ते संपर्क साधत आहेत. या महास्वामींकडे ढोर समाजाचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने भविष्यात जात प्रमाणपत्राचा धोका उद्‌भवण्याची शक्‍यता कमीच आहे. 
श्री व्यंकटेश्‍वर महास्वामी (डी. जी. कटकधोंड) यांनी सार्वत्रिक निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती फक्त नऊ रुपये दाखविल्याने महास्वामी चर्चेचा विषय झाले होते. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांना न्यायालयात नक्कीच न्याय मिळेल. त्यामुळे सोलापूरची पोटनिवडणूक होणार नाही, अशी शक्‍यता श्री व्यंकटेश्‍वर महास्वामी (डी. जी. कटकधोंड) यांनी व्यक्त केली आहे. पोटनिवडणूक झाली तर आपण भाजपकडून इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT