सोलापूर : भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा रविवारी (ता. 20) निर्णय घेतला. तत्पूर्वी, त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार देशमुख यांच्या विजयी हॅट्रिकमध्ये प्रधाने यांचा खारीचा वाटा राहिला आहे. 25 वर्षांपासून ते भाजपमध्ये असून संघटन सरचिटणीसनंतर त्यांच्याकडे शहर भाजपचे सरचिटणीसपद सोपविण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न केले आणि कार्यकर्त्यांची फळी उभारली. महापालिका निवडणुकीत नगरसेवक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. 2012 मध्ये आणि 2017 मध्ये पक्षाने त्यांना विविध ठिकाणाहून उमेदवारी दिली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. दरम्यान, पक्षात प्रामाणिकपणे काम करताना त्यांना युवा मोर्चाचे अध्यक्षपद मिळेल, असा विश्वास होता. त्यानिमित्ताने मी दिल्लीलाही गेलो होते. परंतु, त्या पदावर दुसऱ्याच पदाधिकाऱ्याची निवड झाल्याने त्यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. तरीही, पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पुन्हा पक्षात सक्रिय झाले. आता आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळेल, असा त्यांना विश्वास होता. मात्र, तसे होणार नसल्याची खात्री झाली आणि प्रधाने यांनी मालकांची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रधाने यांना पक्षात आणण्यात यश मिळविले. आता राष्ट्रवादीकडून त्यांना कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालकांच्या कॉलनंतर घेतला निर्णय...
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकतित्रपणे लढल्यास भाजपला महापालिकेवरील सत्तेसाठी ताण काढावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी विद्यमान नगरसेवकांची कामगिरी व तुल्यबळ इच्छुकांचा अभ्यास सुरु केल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटल्यानंतरही पक्षातील काहींनी माझ्या प्रगतीत अडथळाच निर्माण केला. सप्टेंबर महिन्यात प्रभाग रचना, आरक्षण निश्चित होण्यापूर्वीच आमदार विजयकुमार देशमुख (मालक) यांनी कॉल करून तुम्हाला यंदा थांबावे लागेल, उमदेवारी मिळणार नाही, असे सांगितल्याची चर्चा रविवारी प्रधाने यांनी बोलावलेल्या बैठकीत झाली. या पार्श्वभूमीवर आपण भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रधाने कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान, आपण राष्ट्रवादीत जाणार असल्याचे प्रधाने यांनी 'सकाळ'शी बोलतानाही स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.