Bird Counting 
सोलापूर

चला घराच्या परिसरातून करूया पक्षीगणना!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अमेरिकेतील कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी आणि नॅशनल ऑडूबॉन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने द ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट हा कार्यक्रम 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत जगभरात राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम सोलापुरात विहंग मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व वयोगटातील नागरिकांचा असणार सहभाग
सोलापूरच्या विहंग मंडळ आणि इतर समविचारी संस्थांच्या माध्यमातून सिटीझन सायन्स प्रोजेक्‍ट या स्वरूपाच्या उपक्रमात सहभाग नोंदविण्यात येणार आहे. यात कोणत्याही वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येईल. यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याने 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत दररोज किंवा आपल्या सोयीच्या दिवशी आपापल्या निवासस्थानाच्या किंवा शहरातील पक्षी अधिवासाच्या परिसरात कमीतकमी 15 मिनिटे पक्षी निरीक्षण करायचे आहे. ही निरीक्षणे प्रत्येक सहभागी स्वतंत्रपणे सोसायटीच्या वेबसाइटवर जाऊन नोंदवायची आहेत किंवा विहंग मंडळाच्या स्वयंसेवकांकडे लिखित स्वरूपात जमा करता येतील. या सर्व नोंदी एकत्रितपणे निरीक्षकांच्या नावासह सोसायटीकडे पाठविण्यात येतील, असे विहंग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.

सोलापूरकरांना पक्षी अधिवासाच्या परिसरात किंवा आपल्या घराच्या परिसरातूनही द ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी नितीन वडगावकर यांच्याशी 9422645368 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
- डॉ. निनाद शहा,
सदस्य, विहंग मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT