Padalkar Canva
सोलापूर

राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय - गोपीचंद पडळकर

"राष्ट्रवादी मुद्द्यावरून गुद्द्यावर आली ! राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय'

सकाळ वृत्तसेवा

पडकळर म्हणाले, या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांनी पडळकराच्या गाडीवर मारलेला हा दगड नाही, तर महाराष्ट्रातील उपेक्षित पीडितांच्या डोक्‍यात दगड मारण्याचा हा प्रयत्न आहे; पण हा दगड उलटून राष्ट्रवादीच्याच डोक्‍यावर पडणार आहे.

सोलापूर : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यानंतर सोलापूर शहरात त्यांच्या गाडीवर एका अज्ञात युवकाने दगडफेक केली. तो युवक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. "या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी मुद्द्यावरून आता गुद्द्यावर आली आहे', अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. (BJP MLA Gopichand Padalkar allegations against NCP)

कालच्या घटनेनंतर आज (गुरुवारी) गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर शासकीय विश्रामगृहात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. कारण, मागच्या वर्षभरामध्ये घडलेल्या घडामोडी महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांवर अन्याय करणाऱ्या आहेत आणि त्याच्याविरोधामध्ये मी जाहीरपणे आवाज उठवत आहे. ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. अजित पवारांमुळे पदोन्नत्तीमधील मागास्वर्गीयांचं आरक्षण गेलं. त्यामुळे महाराष्ट्रभर छोट्या छोट्या जात घटकांच्या घोंगडी बैठका घेत आहे. आणि घोंगडी बैठकांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी तळातून हललेली आहे. लोक जागे होताहेत ये राष्ट्रवादीला पटत नाहीये, त्यामुळे राष्ट्रवादी मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली आहे.

श्री. पडकळर पुढे म्हणाले, या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांनी गोपीचंद पडळकराच्या गाडीवर मारलेला हा दगड नाही, तर महाराष्ट्रातील उपेक्षित पीडितांच्या डोक्‍यात दगड मारण्याचा हा प्रयत्न आहे, पण हा दगड उलटून राष्ट्रवादीच्याच डोक्‍यावरती पडणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मी स्टंट केला असा आरोप केला; मात्र त्यांनी हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणलं आहे. आमच्या कार्यक्रमात रोहित पवारांच्या फोटोचे टी- शर्ट घातलेले कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या लोकांनी गोळ्या जरी घातल्या तरी महाराष्ट्रातील लोकांना जागं करण्याचं काम थांबवणार नाही, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी लाल रंगात! देशांतर्गत गुंतवणूकदारांचा बाजाराला आधार; Meesho चे शेअर घसरले

माहुली घाटात १५० फूट दरीत कोसळली कार; चालकाचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घटना, कारचा चक्काचूर..

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT