dr. mahaswami 
सोलापूर

भाजप खासदारांपुढे पुन्हा पेच ! पुनर्विलोकनाची याचिका घेतली मागे 

तात्या लांडगे

सोलापूर : जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी सोलापूर न्यायालयात भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्याविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार न्यायालयाने डॉ. महास्वामींविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश सदर बझार पोलिसांना दिले. त्यानुसार त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या या आदेशाचे पुनर्विलोकन व्हावे, अशी याचिका डॉ. महास्वामी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली. मात्र, पोलिस फिर्याद तथा पोलिस तपास थांबविण्याचे अधिकार सत्र न्यायालयास नसल्याचे न्यायालयाने बुधवारी (ता. 11) स्पष्ट केले. 


सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार डॉ. महास्वामींनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याची याचिका माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य दोघांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीकडे दाद मागा, असे सांगितले. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी जात पडताळणी समितीकडे याचिका दाखल केली. जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने जात प्रमाणपत्रासाठी दिलेल्या सर्व पुराव्यांची शहानिशा केली. मात्र, त्यामध्ये तथ्य नसल्याचे निरीक्षण दक्षता पथकाने नोंदवले आणि पार पडलेल्या सुनावणीवेळी डॉ. महास्वामींना मूळ जात प्रमाणपत्र मागूनही त्यांनी ते दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर जात पडताळणी समितीने डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आणि अक्‍कलकोट तहसिलदारांनी त्यांच्याविरुध्द सोलापूर न्यायालयात फिर्याद द्यावे, असे आदेश दिले. दरम्यान, समितीच्या निकालाविरुध्द डॉ. महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता त्यावर 13 मार्चला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, सोलापूर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पुनर्विलोकन व्हावे, अशी याचिका डॉ. महास्वामी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली. मात्र, सत्र न्यायालयास त्याचे अधिकार नसल्याने आता डॉ. महास्वामींना पुन्हा उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. 


उच्च न्यायालयात दाखल करणार पुनर्विलोकन याचिका 
पुनर्विलोकन याचिकेत मॅजिस्ट्रेट कोर्टाने फिर्याद पोलिस तपासासाठी पाठविण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. परंतु, त्याच दिवशी पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याने पर्यायाने तपास थांबवणे अथवा फिर्याद रद्द करण्याचा अधिकार सत्र न्यायालयास नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात फिर्याद रद्द करण्यासाठी याचिका मागे घेण्यात आली आहे. आता उच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली जाईल, असे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे वकिल संतोष न्हावकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT