महापालिकेच्या 'बॉईस'ने वाचविले 1034 रुग्णांचे जीव! Canva
सोलापूर

महापालिकेच्या 'बॉईस'ने वाचविले कोरोनात 1034 रुग्णांचे जीव!

'बॉईस'ने वाचविले 1034 रुग्णांचे जीव! कोरोनात महापालिकेच्या हॉस्पिटलची कामगिरी

तात्या लांडगे

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णवाढ व मृत्यूदरात सोलापूर शहर देशपातळीवर पोचले. अडचणीच्या काळात महापालिकेचे बॉईस हॉस्पिटल सर्वसामान्यांचा आधार बनले.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पहिल्या लाटेत रुग्णवाढ व मृत्यूदरात सोलापूर शहर (Solapur City) देशपातळीवर पोचले. अडचणीच्या काळात महापालिकेचे बॉईस हॉस्पिटल (Boise Hospital) सर्वसामान्यांचा आधार बनले. रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिका आयुक्‍तांनी 9 ऑक्‍टोबर 2020 पासून बॉईस हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचाराची सोय करून दिली. मागील वर्षभरात या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या एक हजार 364 रुग्णांपैकी एक हजार 34 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना बाधितांना उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात "बॉईस'चा मोठा वाटा राहिला आहे. कोरोनापूर्वीच्या स्थितीचा अंदाज घेऊन आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणची आरोग्य सुविधा आता सुधारली आहे. सध्या 32 बायपॅप मशिन व दोन व्हेंटिलेटर त्या ठिकाणी आहेत. दुसरीकडे, तिसऱ्या लाटेची शक्‍यता पाहून त्या ठिकाणी ऑक्‍सिजन निर्मितीचा प्लांट उभारला जात आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अक्षता पवार, डॉ. विजय चौगुले, डॉ. स्वप्नील बिराजदार, डॉ. गीता राठोड, डॉ. कौस्तुभ शिंदे, डॉ. कांचन चिवडे, डॉ. अपेक्षा कुलकर्णी यांनी मोठे योगदान दिले. त्यांना परिचारिका, ब्रदर्स, आया, आशा सेविकांनीही मोठी मदत केली. फार्मासिस्ट शंकर मद्दोल्लू यांनीही रुग्णांना वेळेत औषधे मिळतील यासाठी परिश्रम घेतले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी पांढऱ्या रंगाचे पीपीई किट परिधान करत वैद्यकीय सेवेचे महत्त्व सांगितले. हॉस्पिटलने आता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानेही संपूर्ण तयारी करून ठेवल्याचे डॉ. लता पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

सर्वांनीच केले उत्तम काम

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर व उपायुक्‍त धनराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉईस हॉस्पिटलमध्ये 9 ऑक्‍टोबर 2020 पासून कोरोना रुग्णांवरील उपचार सुरू झाले. हॉस्पिटलमधून मागील वर्षभरात एक हजार 34 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

- डॉ. लता पाटील, वैद्यकीय अधिकारी, बॉईस हॉस्पिटल, सोलापूर

'बॉईस'ची वर्षातील कामगिरी

  • एकूण दाखल रुग्ण : 1,364

  • उपचारातून बरे झाले : 1,034

  • कोरोनामुळे मृत्यू : 44

  • बायपॅपची उपलब्धता : 32

  • व्हेंटिलेटर : 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT