20210104_215716.jpg 
सोलापूर

'बॉईज'ने वाचविले 113 को-मॉर्बिड रुग्णांचे जीव ! गर्भवती महिलांसह 80 वर्षीय महिलेचाही समावेश

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात महापालिकेचे 15 नागरी आरोग्य केंद्रे असून, त्यातील कन्ना चौक परिसरातील बॉईज हॉस्पिटलमध्येच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णालयाच्या परिसरात कामगार वस्ती, झोपडपट्ट्यांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने त्याठिकाणी 56 ऑक्‍सिजन बेडची सोय करुन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. आतापर्यंत या रुग्णालयातून 214 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, त्यात तब्बल 113 रुग्ण को-मॉर्बिड होते.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले बळ
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून महापालिकेच्या माध्यमातून बॉईज हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेड उपलब्ध करुन दिले. याठिकाणी गर्भवती महिला, प्रसुती झालेल्या महिलांसह 60 वर्षांवरील 80 वर्षांपर्यंतच्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. 
- डॉ. लता पाटील, वैद्यकीय अधिकारी, बॉईज हॉस्पिटल, सोलापूर महापालिका

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसून, आज शहरातील गणेश नगर, दक्षिण कसबा, विडी घरकूल, आंबेडकर नगर, शुक्रवार पेठ, हांडे प्लॉट, शिवगंगा नगर (शेळगी), महेश कॉलनी (सम्राट चौक), बॉम्बे पार्क, गवळी वस्ती, निराळे वस्ती, आंबेडकर नगर, जवाहरलाल हौसिंग सोसायटी, बुधवार पेठ, जुनी लक्ष्मी चाळ, जुना संतोष नगर, शिवगंगा नगर (जुळे सोलापूर) आणि समर्थ नगर (उत्तर सदर बझार)येथे 22 रुग्ण आढळले आहेत. त्यातील काही रुग्ण बॉईज हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. शहरातील 11 हजार 134 रुग्णांपैकी 10 हजार 113 रुग्ण बरे झाले आहेत. त्यात बॉईज हॉस्पिटलमधील 214 रुग्णांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णालयात दाखल झालेल्या 80 वर्षीय महिलेनेही कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरातील 421 रुग्णांवर सध्या उपचार असून, त्यापैकी 18 रुग्ण बॉईज हॉस्पिटलमधील आहेत. कोरोना रुग्णांना उपचारासाठी साधारणपणे प्रत्येकी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो. मात्र, या हॉस्पिटलने 112 रेमडेसिवीरचा वापर करुन 214 रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. लता पाटील यांच्यासह डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्यानेच ते शक्‍य झाले आहे.

रुग्णालयाची स्थिती

  • एकूण बेड
  • 56
  • डॉक्‍टर
  • 9
  • नर्स व अन्य कर्मचारी
  • 24
  • कोरोनाचे दाखल रुग्ण
  • 282
  • बरे झालेले रुग्ण
  • 214

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT