सोलापूर ः कोरोनाची लाट गेली व नंतर लसीकरणदेखील सुरू झाले. मात्र शहरातील बॉक्स ऑफिस म्हणजे चित्रपटगृहे अद्यापही बंदच आहेत. शासनाच्या परवानगीनंर देखील चित्रपटगृहांवरील लॉकडाउनचे संकट सुटले नाही. शिवाय रसिकही याकडे फिरकत नसल्याने चित्रपटगृह चालकांबरोबरच यावर अवलंबून असलसेल्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
देशभरात कोरोना महामारीची लाट ओसरताना दिसत आहे. याचाच विचार करून केंद्र शासनाने जवळजवळ सर्वच गोष्टींवर असे निर्बंध उठवायला चालू केले आहेत. केंद्र शासनाच्या अखत्यरित राहून सर्वच उद्योगधंदे सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने चित्रपटगृहे 50टक्के क्षमतेने चालू करण्याची परवानगी दिली होती. परंतु आता चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने चालू करावेत असे आदेश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. सोलापुरात हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, इंग्रजी आदी भाषेतील चित्रपट दाखविण्यात येत असतात. परंतु डिस्ट्रिब्युटर कंपनीच चित्रपट देण्यास तयार नसल्याने चित्रपटगृहांची अवस्था फार बिकट झाली आहे. प्रत्येक डिस्ट्रिब्युटर हा आपले चित्रपट प्रसारित करण्यासाठी नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, सोनी लिव यासारख्या ओटीटी माध्यमांचा वापर करत आहे.
सध्या केंद्र सरकारला मनोरंजनाच्या माध्यमातून मिळणारा टॅक्स या ओटीटी माध्यमांमुळे मिळत आहे. त्यामुळे नवीन चित्रपट चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून प्रेक्षकही पाठ फिरताना दिसत आहेत. त्यामुळे थिएटर लाईनमध्ये काम करणाऱ्या शहरातील पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशामध्ये काही नवीन निर्बंध, नवीन गाईडलाईन्स, खबरदारीचे उपाय शासन नव्याने जाहीर करणार आहे. जाहीर केलेले उपाय हे एक फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, त्यापूर्वीच योग्य ती दखल घेतली तरच या क्षेत्रातील कामगारांना रोजगार मिळतील.
ओसिस मॉलचे व्यवस्थापक ऋतुराज निलेगावकर यांनी सांगितले की, सध्या तरी कोणत्याच प्रकारचे चित्रपट थेअटरमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे डिस्ट्रिब्युटर्स काही रस घेताना दिसत नाहीत. जेव्हापासून शासनाने चित्रपटगृह चालू करण्याचे आदेश दिले, तेव्हापासून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या हे सर्व नियम आम्ही पाळतो आहे. त्यामध्ये मग सोशल डिस्टिन्सिंग असेल किंवा सॅनिटायझेशन करणे असेल. शासनाने जरी 100 टक्के जागांवर चित्रपट चालू करण्याचे आदेश दिले असले तरी जनतेचा प्रतिसाद हा गरजेचा आहे.
आशा सिनेमागृहाचे व्यवस्थापक मंदार नागणे यांनी सांगितले की, सध्यातरी राज्य सरकारने कोणत्याही पद्धतीचे अध्यादेश काढला नाही. परंतु लवकरात लवकर चित्रपटगृहे चालू झाली पाहिजेत. कोरोना रोगावर प्रतिबंधक लसीचा शोध लागला आहे. शासनाने ओटीटी माध्यमांवर चित्रपट प्रसारित करणे थांबवावे, तरच या क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सुटतील, नाहीतर चित्रपटगृहे नामशेष होण्याच्या मार्गावर येतील.
संपादन : अरविंद मोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.