Beating 
सोलापूर

धक्कादायक ! मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून "या' गावात मुलाच्या वडिलास झाडाला बांधून मारहाण 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडिलास भर चौकात झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्‍यातील भाळवणी येथे घडली. दरम्यान, पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की येथील एका मुलीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे. या घटनेची खंत त्या मुलीच्या संबंधित नातेवाईक व भावकीमध्ये होती. त्याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलाने फोन का केला, यावरून मागील रागाचा वचपा काढत त्याला घरापासून तीन किलोमीटर अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून आणखी मारहाण करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर काही क्षणात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान, पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. इतर सहभागी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या संकटात जमावबंदीचा आदेश असताना सामूहिकरीत्या मारहाण करण्याच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT