ब्रह्मपुरी (सोलापूर) : सोलापूर -मंगळवेढा महामार्गावरील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या माचनूर येथील पुलाची अंत्यत दुरवस्था झाली आहे. पुलावरील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून पुलाच्या संरक्षक पाईप तुटून पडल्या आहेत. या महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून तात्काळ महामार्गावरील पुलाची दुरुस्ती करावी अन्यथा या पुलावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा ब्रह्मपुरी (ता.मंगळवेढा) येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष राजन पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
हे ही वाचा : मित्रासोबत मटणाची पार्टी ठरली घाताची ! कासारी येथे ट्रॅक्टरचा नांगर अंगावर गेल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी-नागपूर या महामार्गावर माचनूर- बेगमपूर येथील पुलाची भीमेला आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले होते. पुलावरील संरक्षक पाईप पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. महापुरातील पाण्याच्या मोठ्या दाबाने पुलाची मोठी हानी झाली होती. चार दिवस पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पुलावरील पाणी ओसरताच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू केली. मात्र, त्यानंतर संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी या पुलाची कायमस्वरूपीची कोणतीही दुरुस्ती केली नाही. याबाबत नागरिकांनी वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, पुलाची दुरावस्था पाहून नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या मुलाचा केला आई व तिच्या प्रियकराने खून ! आईला अटक, प्रियकर फरार
या पुलाला पुरेसे संरक्षक पाईप नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्री मोठ्या वाहनांच्या प्रखर लाईटमुळे छोटया वाहनचालकांना रस्ता दिसून येत नसून थेट नदी कोसळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावरून कोणाचा जीव गेल्यावर या पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे का? असा संतापजनक सवाल वाहन चालकातून विचारला जात आहे. या दुरवस्था झालेल्या पुलाची आठ दिवसांत दुरुस्ती करावी, अन्यथा हा महामार्गवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.