st bus
st bus 
सोलापूर

अर्रर्र ! आगार व्यवस्थापकांच्या खांद्यावर उत्पन्नाचे ओझे 

तात्या लांडगे

सोलापूर : दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथील दुर्घनटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने सहली काढण्याला निर्बंध घातल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. लालपरी किती सुरक्षित आहे, काय सुविधा आहेत, याची माहिती मुख्याध्यापक व शिक्षणाधिकाऱ्यांना पटवून देण्याचे आदेश महामंडळाने आगार व्यवस्थापकांना दिले. त्यानुसार आगार व्यवस्थापकांनी शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना विनंती पत्रे पाठविली. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात 36 कोटींची वाढ झाली. 2019-20 मध्ये 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता प्रत्येक आगार व्यवस्थापकांच्या खांद्यावर उत्पन्नाचे ओझे देण्यात आले आहे. 


शैक्षणिक सहली मुख्याध्यापकांनी काढूच नयेत, त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी बंधनकारक असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले. तर दुघर्टनेस मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट केले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी सहली काढणेच बंद केले. शैक्षणिक वर्षातील एक चांगला उपक्रम बंद पडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड तर झालाच, पण त्याचा अप्रत्यक्ष फटका एसटी महामंडळाला बसला. दरवर्षी शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीला मिळणारे हमखास उत्पन्न एकदमच कमी झाले. 2017-18 मध्ये महामंडळाला 63 कोटींचे उत्पन्न मिळाले, मात्र शिक्षण संचालकांच्या पत्रामुळे 2018-19 मध्ये केवळ 24 कोटींचेच उत्पन्न मिळाले. त्यानंतर हक्‍काचे उत्पन्न बुडाल्याने चिंतेत सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाने शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना पत्राद्वारे विनंती केली. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलीतून 60 कोटींचे उत्पन्न मिळाले. 


ठळक बाबी... 

  • शैक्षणिक सहलीतून 2017-18 मध्ये लालपरीला मिळाले 63 कोटी 
  • शिक्षण संचालकांच्या पत्रामुळे 2018- 19 मध्ये बहूतांश शाळांनी सहलीच काढल्या नाहीत 
  • मागील वर्षी लालपरीला सहलीतून केवळ 24 कोटींचेच उत्पन्न मिळाले 
  • आगार व्यवस्थापकांनी मार्केटिंग केल्याने यंदा मिळाले 60 कोटींचे उत्पन्न 
  • शैक्षणिक सहलीसाठी दरवर्षी 10 ते 14 हजार बसेस उपलब्ध : ऍडव्हॉन्स बुकिंगची सोय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT