Corona 
सोलापूर

"कोरोना' नाही तरी "या' शहरातील उद्योग-व्यवसायाला फटका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जगभरात थैमान घालणाऱ्या "कोरोना'ची दहशत सोलापुरातही जाणवत आहे. "कोरोना'चा एकही रुग्ण सोलापुरात आढळून आला नाही, तरी शहरातील उद्योग-व्यवसायाला याचा फटका बसत आहे. काही देशांनी व्हिसा थांबवल्याने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर परिणाम झाला आहे. आयात-निर्यातीवरही बंधने आली आहेत. विदेशी व्यापारी व ग्राहकांबरोबरच्या व्यापारी संबंधावर परिणाम होत आहे. आयात माल उपलब्ध होत नसल्याने त्याच्या किमती वाढत आहेत. एकूणच, शहरातील उद्योग-व्यवसायाला "कोरोना'मुळे फटका बसत आहे.

"कोरोना'मुळे आर्थिक व्यवस्थेवर परिणाम
"कोरोना'च्या भीतीमुळे दैनंदिन जीवन व अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. बाजारपेठेत ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. दळणवळणावर परिणाम झाल्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प होत आहेत. होळी व रंगपंचमीवरसुद्धा मंदीचे सावट आहे. अन्नधान्याच्या विक्रीवरही परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांचा व्यवसाय उधारीवर चालतो, मात्र गेल्या 15 दिवसांपासून व्यवसाय नसल्याने व उधारीची वसुली होत नसल्याने कामगारांचे पगार होणेही मुश्‍कील झाले आहे. आयात-निर्यातीवर परिणाम झाल्याने डॉक यार्डवर निर्यातीचा माल पडून आहे. पुढील काही दिवसांत औषधांचा तुटवडाही जाणवू शकतो. बॅंकेचे व्याज वाढत आहे. "कोरोना'ची साथ आटोक्‍यात त्वरित न आल्यास उद्योग-व्यवसायांवर असाच परिणाम होत राहण्याची भीती आहे.
- राजू राठी,
अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर

आयात-निर्यातीवर होतोय परिणाम
"कोरोना'मुळे चीनमधून कच्चा माल, कलर व केमिकलची आयात सध्या बंद झाली आहे. यंत्रमागांसाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स स्पेअर पार्टस्‌ची आवश्‍यकता असते, तेही आता मिळणे कठीण होणार आहे. अनेक देशांनी व्हिसा थांबवल्याने दळणवळणावर त्याचा परिणाम होत असून, व्यापारी व खरेदीदारांशी व्यवहार थांबले आहेत. "कोरोना' आटोक्‍यात न आल्यास उत्पादनांची निर्यात ठप्प होईल. प्रत्येक देश आयात-निर्यातीच्या वस्तू तपासूनच घेत आहेत. यापुढे आयात-निर्यातीवर मोठा परिणाम जाणवेल. शेअर मार्केट गडगडल्याने त्यातील गुंतवणूकदार व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उधारीची वसुली थांबल्याने कामगारांचे पगार, बॅंकांचे कर्ज यासह पुढील आर्थिक गणिते जुळवणे कठीण जाणार आहे.
- पेंटप्पा गड्डम,
अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ

कापडाच्या दरवाढीमुळे वाढतोय उत्पादन खर्च
"कोरोना'मुळे आयात-निर्यातीचे नियम बदलले आहेत. देश-विदेशी प्रवासावर अनेक देशांनी व्हिसा रद्द करून बंधने आणली आहेत. त्यामुळे खरेदीदार व व्यापारी भारतात येत नसल्याने पुढील ऑर्डरची नोंदणी होणे कठीण होत आहे. चीनमधून सुपर पॉली कापड आयात होत होते, आता कोरोनामुळे आयात बंद झाली आहे. ज्यांच्याकडे पॉलिस्टर कापडाचा स्टॉक आहे त्यांच्याकडून किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या गारमेंट उत्पादकांकडे जो स्टॉक आहे, त्याचा वापर करून कसेबसे उत्पादन सुरू आहे. मात्र "कोरोना'ची साथ आटोक्‍यात न आल्यास उद्योगावर विपरीत परिणाम होणार आहे. सध्या वाढलेल्या कापडाच्या दरांमुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. मात्र, ज्या पार्टीशी अगोदर दर करार करून ऑर्डर घेतली आहे, त्यांना दर वाढवून उत्पादन देणे म्हणजे व्यापारी संबंध बिघडण्याची स्थिती आहे.
- प्रकाश पवार,
सहसचिव, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ

हॉटेल व्यवसाय 50 टक्के घटला
"कोरोना'ची दहशत जगभरात पसरली आहे. अनेक देशांनी प्रवाशांच्या व्हिसा काही दिवसांसाठी रद्द केल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा कोलमडली आहे. "कोरोना' आटोक्‍यात कधी येईल व सुरक्षित प्रवासासाठी नागरिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे जाणवते. त्यामुळे रेल्वे, एसटी, ट्रॅव्हल्सचा व्यवसायही प्रवाशांअभावी ठप्प झाला आहे. परिणामी शहरातील हॉटेल व्यवसायातही 50 टक्के घट झाली आहे. प्रवासी नसल्याने लॉजमधील रूम रिकाम्या आहेत. रेस्टॉरंटच्या व्यवसायावरही 30 टक्के परिणाम झाला आहे. आइस्क्रीमला मागणी नाही. जे ग्राहक येत आहेत ते त्यांच्या खासगी गाड्यांनी येत आहेत. "कोरोना'ची साथ आटोक्‍यात आल्यास व्यवसायाला गती येईल, अशी आशा आहे.
- अनिल चव्हाण,
अध्यक्ष, सोलापूर हॉटेल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

SCROLL FOR NEXT