cancer 
सोलापूर

सहाशे कोटींच्या खर्चानंतरही कर्करुग्ण वाढलेच....राज्यातील कर्करुग्णांची स्थिती जाणून घ्या 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात गुटखा बंदी असतानाही खुलेआम चालणारी विक्री, मावा, तंबाखू खाणाऱ्यांचे वाढलेले प्रमाण आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे कर्करुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये तोंडाचा कर्करोग असलेल्या 40 लाख 16 हजार तर स्तनाचा कर्करोग असलेल्या 93 हजार आणि गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या 17 लाख 58 हजार संशयीत रुग्णांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य सेवा विभागाने दिली. कर्करोग निवारणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी सुमारे सहाशे कोटींचा खर्च केला जातो. तरीही कर्करुग्णांची संख्या वाढतच असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 


राज्याला कुष्ठरोग, बालमृत्यूपासून मुक्‍त करण्याचे नियोजन अनेकवेळा करण्यात आले. मात्र, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे सुधारली नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानापासून चार हात लांब असलेल्या आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याने रुग्णांना वेळेत उपचारच मिळत नाहीत. दरम्यान, राज्यात गुटखा बंदी असतानाही शेजारील राज्यातून गुटखा आणून खुलेआम विक्री करण्यात येत असतानाही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून काणाडोळा केला जात असल्याची चर्चा आहे. मागील दोन वर्षात एकट्या सोलापूर जिल्ह्यात तब्बल 100 कोटींहून अधिक रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. राज्यभरात दरवर्षी आठशे ते बाराशे कोटींचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला जातो. या पार्श्‍वभूमीवर राज्यात तोंडाचा कर्करोग वाढू लागल्याने जनजागृतीवर भर दिला जात असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. 


जनजागृतीवरच सर्वाधिक भर 
सरकारी दोन सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयातून व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. कर्करोगाबाबत जनजागृतीची खूप गरज असून आरोग्य विभागातर्फे गावोगावी विशेष अभियान राबविले जाते. राज्यातील 30 वर्षांवरील सर्वच महिला व पुरुषांची तपासणी पाच वर्षातून एकदा केली जाते. सर्व रुग्णालयांकडून माहिती मिळत नसल्याने राज्यभरात नेमके किती कर्करुग्ण आहेत, हे निश्‍चित नाही. 
- डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्य सेवा ,मुंबई 


राज्यातील संशयित कर्करुग्ण (2019-20) 
मुखाचा कर्करोग : 40.16 लाख 
स्तनाचा कर्करोग : 93 हजार 
गर्भाशयाचा कर्करोग : 17.58 लाख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

Sanjay Raut : नाशिक दत्तक घेतले मग समस्या का सुटत नाहीत? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Bala Nandgaonkar : "राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवा!" बाळा नांदगावकरांचा भाजपला टोला

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

SCROLL FOR NEXT