सोलापूर

सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेसमध्ये तस्करी, सोलापुरातून गांजा जप्त

विजय थोरात

या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी सांगितले. शनिवारी रात्री 8.45 वाजता हा गांजा पकडण्यात आला.

सोलापूर: सिकंदराबाद येथून राजकोटकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक 02756 सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेसमध्ये सापडलेल्या प्रवासी बॅगेत सुमारे 25 हजार रुपयांचा 12.774 किलो गांजा असल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वेतून गांजाची तस्करी होत असून याविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक पी. डी. चव्हाण यांनी अज्ञात इसमाविरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी सांगितले. शनिवारी रात्री 8.45 वाजता हा गांजा पकडण्यात आला.

सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस सोलापूर स्थानकात येत असताना काही वेळ सोलापूर रेल्वे स्थानकात थांबली. गाडीत रात्री रेल्वे पोलिस गस्त घालत असताना त्यांना रेल्वेच्या बी 3 या डब्यात एक बॅग आढळून आली. ही बॅग कोणाचीही नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनतर रेल्वे सोलापूर स्थानकात आल्यावर निरीक्षक चव्हाण यांना याबाबत लोहमार्ग पोलिसांना कळविले. त्यांच्यासह पथकाने रेल्वेत जाऊन पाहणी केली. तेथून बॅग पोलिस स्थानकात आणली असता त्यात प्रवासी बॅगेत 12 किलो गांजा भरलेला आढळला.

या गांजाची किंमत 25 हजार 728 रुपये आहे. हा गांजा कोणी, कुठून व कोणासाठी पाठवला याचा शोध घेणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन अटक केली जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. ही कामगिरी शिंदे, वाघमारे, चव्हाण, गोरे, खताळ, गायकवाड आणि रेल्वे सुरक्षा बल चे स्टाफ यांनी बजावली आहे.

चोरांचा 'प्रवासी फंडा'

गाडी क्रमांक 02756 सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेसमध्ये सापडलेल्या बेवारस प्रवासी बॅगेत वरील बाजूस कपड्यांचा समावेश होता. वरवर कपड्यांचा भास होता. पण त्यामध्ये ठासून गांजा भरलेला पाहून पोलिसांना धक्का बसला. गांजा तस्करीसाठी चोरट्यांनी वापरलेला प्रवासी बॅगेचा 'प्रवासी फंडा' चर्चेचा विषय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT