Sugar Factory sakal
सोलापूर

गाळप परवाना न घेता साखर कारखाना सुरू केल्यास एमडी वर होणार गुन्हा दाखल

सन 2022/23 हा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक साखर कारखान्यांचा अग्नी प्रदिपन सोहळा थाटात पार पडला आहे.

राजकुमार शहा

सन 2022/23 हा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक साखर कारखान्यांचा अग्नी प्रदिपन सोहळा थाटात पार पडला आहे.

मोहोळ - पुणे विभागातील जे सहकारी व खाजगी साखर कारखानदार 15 ऑक्टोबर पूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू करतील त्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकावर तसेच जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पारित केला आहे.

सन 2022/23 हा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक साखर कारखान्यांचा अग्नी प्रदिपन सोहळा थाटात पार पडला आहे. कारखाना सुरू करताना व बंद करतानाही शासनाची परवानगी घेणे आता बंधनकारक केले आहे. मात्र अनेक सहकारी व खाजगी साखर कारखानदार गाळप परवाना न घेता कारखाने सुरू करतात. ता 19 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक संपन्न झाली, त्या बैठकीत वरील प्रमाणे निर्णय झाला आहे. त्या निर्णया संदर्भातील पत्र प्रत्येक साखर कारखान्यांना पाठवली आहेत.

ऑक्टोबर महिना हा पावसाचा महिना असतो. त्यामुळे उसाच्या फडातून वाहनाद्वारे ऊस काढणे ही तसेच अन्य अडचणीचा सामना करावा लागतो. उसाची रिकव्हरीही व्यवस्थित बसत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. उसाच्या सरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने व तो ऊस गाळपा साठी तोडला तर उसाच्या पेऱ्यात पाण्याचे प्रमाण जादा असते. त्यामुळे नुकसानीची बाजू ज्यादा असते. सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, खाजगी साखर कारखान्यांचे जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार त्या त्या जिल्ह्यातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले असून, तो साखर कारखाना कुठल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे त्या त्या पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षका कडुन त्याची अंमलबजावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

Shocking News : घरात धार्मिक कार्य, पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी तरुणीने खाल्ल्या गोळ्या, दुर्देवी मृत्यू

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

SCROLL FOR NEXT