Sadashiv Paddune sakal
सोलापूर

Caste Certificate Issue : जातीच्या दाखल्यासाठी मुलीला प्रवेश नाकारला; प्रांताधिकाऱ्यांना समजते तेंव्हा...

गरीबी पाचवीलाच पुजलेली, अशात एक ना अनेक संकटांचा सामना करत सोलापूर येथील रूपाली माने या मुलीच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत.

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) - गरीब कुटुंबातील एका मुलीला जातीचा दाखला नसल्याने, नवोदय विद्यालयातील प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याची बाब माजी शिक्षक असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यास समजताच सामाजिक बांधिलकीतून, खुर्चीचा रुबाब, ऐट बाजूला ठेऊन, माणुसकी आणि सुशासन यांचा ताळमेळ घालत सर्व कागदपत्रांची पूर्तता करत तातडीने दाखला मिळवून दिल्याने, मुलीचा नवोदयमधिल शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे असे मदतीला धावून आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

गरीबी पाचवीलाच पुजलेली, अशात एक ना अनेक संकटांचा सामना करत सोलापूर येथील रूपाली माने या मुलीच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. आईच्या कष्टाने जाण ठेवून मुलीही उच्च शिक्षण घ्यायच या ध्येयाने प्रेरित होऊन प्रयत्नशील आहेत. याच जिद्द व चिकाटीच्या जोरावर एका मुलीची नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली.

अत्यंत बिकट परिस्थिती असताना मुलीची झालेली निवड रुपाली माने यांना 'आनंद गगनात मावेनासा' अशी होती. परंतु प्रवेशासाठी गेल्यानंतर जातीच्या दाखल्याचा विषय आला. हा दाखला आठ दिवसात मिळवण्याचे असाध्य काम त्यांच्या समोर उभे ठाकले. कागदपत्रे जमा करण्याची धावपळ सुरू झाली.

सर्व कागदपत्रांची पुरावे हाताशी होते पण 'सरकारी काम म्हणजे सहा महिने' हे सर्वश्रुतच आहे. हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे होते. कारण मुलीच्या प्रवेशाची अंतिम तारीख जवळ येत चालली तसतशी रुपाली माने यांची धाकधूक वाढली.

दाखला मिळवण्यासाठी शासन दरबारी अनेक हेलपाटे मारले परंतु कुणीही मदत करायला तयार नव्हते. त्यामुळे आपल्या मुलीला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार नाही. या टेन्शनमध्ये असताना मुलीचे शिक्षक अनिल कुलकर्णी यांनी हि बाब शिक्षक राजेंद्र पडदुणे यांच्या माध्यमातून बार्शी व उत्तर सोलापूरचे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या कानावर घातली.

पूर्वाश्रमीचे शिक्षक असलेल्या प्रांताधिकारी पडदुणे यांनी परिस्थिती जाणिव लक्षात घेत. स्वतः हून या प्रकरणासाठी तहसील कार्यालयात दाखल होत. आवश्यक कागदपत्रे स्वतः छाननी करून खात्री पटल्यानंतर जे काम कमीत कमी महिनाभर होणार नाही, ते काम सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पाळून पुर्ण करत अगदी वेळेत दाखला मिळवून दिला.

एवढ्यावरच न थांबता नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी काही अडचणी आली तर प्राचार्यांना बोलतो. अशी खंबीर साथही दिली. प्रांताधिकारी पडदुणे यांच्या तत्परतेमूळे नवोदय मधिल शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका मुलीला प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

नवोदय मधिल प्रवेशाची मुदत संपत आली असताना, जातीचा दाखला मिळणे कठीण झाले होते. तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत होते. परंतु, सकारात्मक काही दिसत नव्हते. त्यामुळे मुलीला प्रवेश मिळणार नाही, या चिंतेत असताना प्रशासनातील देवदूत म्हणून प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे मदतीला आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आहे. प्रशासनातील असे कर्तव्यदक्ष गोरगरीबांसाठी तत्पर असणारे अधिकारी क्वचितच पहायला मिळतात.

- रूपाली माने, पालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

SCROLL FOR NEXT