तीन महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग ESAKAL
सोलापूर

सोलापूर शहरात पुन्हा चेन स्नॅचिंग

वसंत नगरातील घटना; तीन दिवसांत दुसरी घटना

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - शहरात दोन दिवसांत दुसऱ्यांदा चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला आहे. २० एप्रिलला शेळगी परिसरात अशीच घटना घडली होती. तत्पूर्वी, १८ मे रोजी प्रिती चिदानंद भावी (रा. हुमानबाद, जि. बिदर) यांच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरून आलेल्या तरूणाने पळवून नेले आहे. भावी यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

चाटला साडी सेंटर ते शेळगीतील भीम नगर या रोडवर मंगल राजकुमार पांढरे यांच्या गळ्यातील २७ हजारांचे गंठण मागून आलेल्या दुचाकीस्वाराने हिसकावून नेले होते. २० एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्याचा तपास जोडभावी पेठ पोलिस अजूनही करीत आहेत. तेवढ्यातच दुसरी घटना घडली आहे. दरम्यान, प्रिती भावी या त्यांच्या मावस भावाच्या विवाहासाठी हुमानाबादहून सोलापुरात आल्या होत्या. जगदिश मंगल कार्यालयातून त्या मामाच्या मुलीच्या घरी जात होत्या. वसंत नगरातील गणपती मंदिरासमोर आल्यानंतर मागून आलेल्या दुचाकीस्वाराने अचानक त्यांच्या दुचाकीजवळ त्याची गाडी नेली आणि प्रिती भावी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढले. ३० हजार रुपयांचे गंठण चोरट्याने १८ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास चोरून नेल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस उपनिरीक्षक मुरकुटे तपास करीत आहेत.

महिलांमध्ये भीतीचे वातावरण

दुचाकीवरून घराकडे किंवा नातलगांकडे जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर वॉच ठेवून अनोळखी दुचाकीस्वार चेन स्नॅचिंग करीत आहेत. त्यामध्ये दुचाकीवरून जाणारी महिला रस्त्यावर पडेल, तिच्या जीवाचे बरे वाईट होईल, याचा चोरटे काहीच विचार करीत नाहीत. तीन दिवसांत दोन घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील बंद घरांमध्ये चोरी होते, सकाळी घर उघडे असलेल्या घरातील लॅपटॉप, मोबाइल चोरी होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuela  Missile Attack : नव्या वर्षात नवं युद्ध? व्हेनेझुएलाच्या राजधानीवर हल्ले, ७ मिसाइल डागले कुणी?

UPI Scam Alert : तुम्ही UPI वापरता? तर सावध व्हा! या '4 चुका’ टाळल्या नाहीत तर बँक खातं होऊ शकतं रिकामं

BCCI च्या निर्देशानंतर मुस्तफिजूर रेहमानला संघातून काढणार की नाही? शाहरुख खानच्या KKR ने केले स्पष्ट

Mumbai Local: मुंबईकरांचं वेळापत्रक कोलमडणार! २६० लोकलफेऱ्या रद्द होणार, कुठे-कसा ब्लॉक? जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi : कर्णधार म्हणून पदार्पणात वैभव अपयशी; दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर गांगरला अन्...

SCROLL FOR NEXT