Chaitra Yatra pandharpur
Chaitra Yatra pandharpur sakal
सोलापूर

Chaitra Yatra : चैत्री यात्रे साठी प्रशासन सज्ज

राजकुमार घाडगे

पंढरपूर : चैत्री यात्रा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने राज्यभरातून भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा रोड, चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गुरुवारी (ता.३०) सारडा भवन पर्यंत गेली असून श्रींच्या दर्शनासाठी अडीच तास लागत आहेत.

कोरोना नंतर निर्बंध मुक्त वातावरणात यंदा प्रथमच चैत्री यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. यावर्षी चैत्र एकादशी रविवारी (ता.२) आहे. चैत्री यात्रे करिता आलेल्या भाविकांना सोई सुविधा पुरविण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर नगरपरिषद, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी श्री विठ्ठल मंदिर परिसरात शेडनेटचे आच्छादन करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात फिरताना भाविकांना अडथळा निर्माण होऊ नये याकरिता त्या परिसरात फिरत्या विक्रेत्यांना व तृतीय पंथीयांना मनाई करण्यात आली आहे. गोपाळपूर रस्त्यालगतच्या दर्शन बारी मध्ये कायमस्वरूपी चार तर तात्पुरत्या दोन अशा एकूण सहा पत्रा शेडमध्ये दर्शन रांग उभारण्यात आली आहे. त्या परिसरामध्ये आपत्कालीन कक्ष, वैद्यकीय सेवा कक्ष, पोलीस मदत केंद्र, तात्पुरती स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना दशमी ते द्वादशी दरम्यान खिचडी, लिंबू सरबत, ताक, मठ्ठा याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री संत गजानन सेवा संघाच्या १७५ स्वयंसेवकांच्या सहाय्याने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व पत्रा शेड दर्शन रांग परिसरात दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. दरम्यान आज नवमी दिवशी श्री विठ्ठल दर्शन घेऊन आलेले संजीव चिंधू शिंदे (रा.औरंगाबाद) म्हणाले, आज सकाळी नऊ वाजता दर्शन रांगेत उभा राहिलो होतो.

सुमारे अडीच तासानंतर सकाळी साडेअकरा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. दरम्यान राज्य शासनाने नुकतेच महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे चैत्री यात्रेसाठी महिला भाविकांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला भाविकांसाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती पंढरपूर आगार प्रमुख रत्नाकर लाड यांनी 'सकाळ ' शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT