p. pur 
सोलापूर

पंढरपुरात 13 वर्षानंतर चंद्रभागेला महापूर

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालु्क्यातील ओढे नाल्यांनाही पूर आला आहे. त्यातच उजनी धरणातून भीमानदी पात्रात 2 लाख 50 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागेमध्ये 1 लाख 82 हजार क्युसेक पाणी आले आहे. त्यामुळे चंद्रभागेला महापूर आला आहे.

2007 नंतर 13 वर्षांनी चंद्रभागेला महापूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठ लगत असलेल्या सुमारे सहा हजार कुटुंबे बाधीत झाली असून एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे, अशी माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

दरम्यान पूराच्या पाण्यामुळे पंढरपूर-,सातारा, पंढरपूर-पुणे, पंढरपूर-विजापूर, पंढरपूर-सोलापूर या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. आज दुपारपर्यंत चंद्रभागेत तीन लाख क्युसेक पाणी येण्याची शक्यता असल्याने एनडीआरएफची एक टीम दाखल झाली आहे. पंढरपूर शहरा लगतचा नवीन पूर आणि अहिल्यादेवी हे दोन्ही पूल वाहतूकीसाठी बंद केले आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

त्यातच उजनीतून पाणी सोडल्याने भीमानदीकाठच्या सुमारे 55 गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गावांना जोडणारे मार्ग देखील बंद झाले आहेत. तेथील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे कासाळगंगा ओढयालाही पूर आला आहे. ओढ्याकाठच्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे.

चंद्रभागेला आलेल्या पुरामुळे शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, आंबेडकर नगर, आंबाबाई पटांगण, लखुबाई मंदिर आदी सखल भागात पाणी शिरल्याने येथील सुमारे एक हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन ही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT