Chase the virus 
सोलापूर

"या' तालुक्‍यात "चेस द व्हायरस' धडाक्‍यात सुरू; दररोज "इतक्‍या' टेस्टचे नियोजन 

राजकुमार घाडगे

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून "चेस द व्हायरस' ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पंढरपूर तालुक्‍यातील ग्रामस्थांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहेत, अशी माहिती पंढरपूर तालुक्‍याचे ग्रामविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली. सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट ही मोहीम सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

या मोहिमेअंतर्गत पंढरपूर तालुक्‍यातील ग्रामीण भागात दररोज 500 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. 7) पंढरपूर तालुक्‍यातील वाखरी, लक्ष्मी टाकळी, शेगाव दुमाला, सरकोली, भंडीशेगाव या गावांतील इच्छुक ग्रामस्थांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या मोहिमेमध्ये संबंधित गावातील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ही मोहीम राबवण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रविकिरण घोडके, पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. धनंजय सरवदे, डॉ. जाधव, रोहन पॅथॉलॉजी लॅबचे राजेंद्र जोशी यांच्यासह आशा वर्कर व कोव्हिड योद्धे यांनी परिश्रम घेतले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे, सामाजिक कार्यकर्ते औदुंबर पोतदार, कविता धोत्रे-राजमाने आदी उपस्थित होते. 

ग्रामविकास अधिकारी रविकिरण घोडके म्हणाले, ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये सर्दी, ताप, थंडी यासह सारीची काही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी स्वतःहून ही टेस्ट करून घ्यावी; जेणेकरून जे पॉझिटिव्ह असतील त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येतील. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे तरच आपण कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास यशस्वी होऊ. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

SCROLL FOR NEXT