chember photo.jpg
chember photo.jpg 
सोलापूर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकाऱ्यांच्या मागण्या 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: अनलॉकमध्ये उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करून विविध सवलती उद्योजकांना द्याव्यात, अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या वतीने अध्यक्ष राजू राठी यांनी सोलापुरातील उद्योग व व्यवसायासंबंधी विविध समस्यांचे निवेदन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत दिले. 

निवेदनात कमर्शिअल व इंडस्ट्रिअल, यंत्रमाग उद्योग, गारमेंट उद्योगाचा सहा महिन्यांकरिता स्थिर आकार रद्द करावा, पॉवर फॅक्‍टर पेनल्टी रद्द करण्यात यावा, उद्योग व व्यावसायिकांना वीजबिल भरण्याकरिता समान हप्ते बांधून जुलै 2020 पर्यंत सवलत द्यावी, नियमित बिल भरणाऱ्या उद्योगांना तीन टक्के सवलत बिलात द्यावी, महापालिका क्षेत्रातील मिळकत कर 50 टक्के कमी करावा; अथवा तीन महिन्यांकरिता सूट द्यावी, एमएसएमईच्या 20 टक्के ऑटोमोटिव्ह लोन स्किममध्ये सहकारी बॅंकांचा समावेश करावा, त्यामुळे उद्योजकांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा होईल. तसेच लोन स्कीममध्ये ट्रेडर्सचा समावेश व्हावा, लॉकडाउनमध्ये जीवनावश्‍यक वस्तू (किराणा आदी) व्यापारी व मेडिकल्स व्यापाऱ्यांचा 50 लाखांचा विमा शासनाने उतरावा, अभय योजनेची मुदत सहा महिने वाढवावी, जीएसटी भरण्याची मुदतवाढ ऑगस्ट 2020 पर्यंत करावी, 
नॅशनल पेन्शन स्कीम छोटे व्यापारी व स्वयंरोजगार करणाऱ्या व्यापाऱ्यांना केंद्र शासनाने 22 जुलै 2019 मध्ये सुरू केली, त्यामध्ये 1.50 करोडपर्यंत उलाढाल असणाऱ्यांनाच याचा लाभ मिळतो. त्याचा लाभ जास्तीत जास्त छोट्या व्यापाऱ्यांना व स्वयंरोजगार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मिळेल असा प्रयत्न असावा,

टेक्‍स्टाईल, टूर व ट्रॅव्हल्स, रिअल इस्टेट, हॉटेल व रेस्टॉरंट आदींना विशेष पॅकेजची गरज आहे. मेडिकल सेक्‍टरमध्ये गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांची उभारणी मोठ्या प्रमाणात व्हावी. सोलापुरातील प्रस्तावित दोन्ही एमआयडीसी सुरू कराव्यात. नवीन उद्योग आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सोलापूरचासुद्धा विचार करावा. राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे व टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी. शेतीमध्ये नवनवीन पिके घेण्याकरिता जिल्हानिहाय मार्गदर्शन केंद्र उभे करावे, आदी मागण्या त्यांनी मांडल्या. यावेळेस सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव धवल शहा, खजिनदार नीलेश पटेल, संचालक शैलेश बचुवार आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT