सोलापूर

बापरे...! इतक्या लाखांचे धनादेश "बाऊन्स' 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : मिळकत कराच्या थकबाकीपोटी देण्यात आलेले सुमारे सहा लाख रुपयांचे धनादेश "बाऊन्स' झाले आहेत. संबंधित मिळकतदारांना धनादेशावरील रक्कम दंडासह भरण्याची नोटीस बजावण्यात आली असून, ती मुदतीत न भरल्यास त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई केली जाणार आहे.

17 धनादेश बाऊन्स
या प्रकरणी संबंधित मिळकतदाराविरुद्ध पोलिस कारवाई केली तर न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील या भीतीने कारवाई करण्यास अधिकारी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यामुळे आजच्या घडीला जमा असलेल्या धनादेशापैकी जवळपास 17 धनादेश "बाऊन्स' झालेले आहेत. मात्र, तरीही संबंधितांविरुद्ध कारवाई केली नाही. या संदर्भात "ई-सकाळ'वर बातमी प्रसिद्ध झाल्यावर कर संकलन विभागाने तातडीने अशा मिळकतदारांची यादी तयार केली असून, संबंधितांना पैसे भरण्याची नोटीस पाठवली आहे. 

विशेष वसुली मोहिम सुरु 
सध्या महापालिकेची मिळकत कर थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आहे. थकबाकीपोटी नळजोड तोडणे, जंगम मालमत्ता जप्त करणे आणि प्रसंगी पोलिस कारवाई करणे अशा पद्धतीने कारवाई केली जात आहे. कारवाईच्या भीतीने अनेक मिळकतदार खात्यावर पुरेशी रक्कम नसतानाही धनादेश देतात आणि वेळ मारून नेतात. सुटका झाल्याचे मिळकतदाराला तर वसुली झाल्याची कर्मचाऱ्याला समाधान वाटते. मात्र जमा झालेले धनादेश हे केवळ कार्यालयात शिलकेत पडू लागले आहेत, अशी स्थिती आहे. 

पाच नळजोड तोडले 
मिळकत कराच्या थकबाकीपोटी बुधवारी विडी घरकूल परिसरातील पाच नळजोड तोडण्यात आले. दिवसभरात एकूण दोन लाख सहा हजार 150 रुपयांची वसुली करण्यात आली. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या नावाचे डिजिटल फलक तयार झाले असून, ते संबंधित भागात लावण्यात येणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT