Esakal
सोलापूर

"राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर लगेच देईन !'

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर लगेच देईन

तात्या लांडगे

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शुक्रवारी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची पुढील भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात (Reservation of Maratha community) मार्ग काढण्यासाठी आपण राज्यभर दौरा करून तज्ज्ञांची मते जाणून घेत आहोत. समाजाला आरक्षण जर राजीनामा देऊन मिळणार असल्यास लगेच राजीनामा देईन, असे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आज सोलापुरात सांगितले. राज्य सरकारच्या हातातील लाभ सरकारने मराठा समाजाला द्यावेत, यासाठी 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना भेटणार असून तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (Chhatrapati Sambhaji Raje said that if gets Maratha reservation by resigning, he will give it immediately)

आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील वर्डिंग्जचा अभ्यास राज्य सरकारने व्यवस्थित करण्याची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. धाराशिव, लातूर, नांदेडनंतर आता मी सोलापूर दौरा केला आहे. राज्यभर फिरत असताना मराठा, ओबीसीसह अन्य समाजातील तज्ज्ञांची चर्चा करून समाजातील त्यागी मंडळींचीही मते जाणून घेत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी या वेळी सांगितले.

माझा दौरा कोणत्याही पक्षाविरुद्ध अथवा सरकारविरोधात नसून समाजाच्या न्याय्य हक्‍कासाठी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दोन हजार 185 नव्हे तर आणखी खूप उमेदवारांच्या नियुक्‍त्या रखडल्या आहेत. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुण अस्वस्थ, दु:खी झाला आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या हातात जे आहे, ते त्यांनी तत्काळ द्यावे, अशी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापुरातील पत्रकार परिषदेस माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माऊली पवार, ज्ञानेश्‍वर मुळे, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले...

  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्‍तव्य म्हणजे पक्षाची भूमिका

  • कायदेशीर मार्ग काढण्यासाठी राज्यभर दौरा; मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर माझी जाहीर होईल भूमिका

  • खासदार असल्याने संसेदत साजरी झाली छत्रपती शिवरायांची जयंती; तरीही राजीनाम्यानंतर आरक्षण मिळणार असल्यास त्याचीही तयारी

  • राज्य सरकारने सारथी, मराठा समाजाच्या मुलांची वसतिगृहे, एमपीएससीच्या मुलांना नियुक्‍त्या द्याव्यात

  • 28 मे (शुक्रवारी) ठरणार मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची पुढील भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT