Sarpanch Canva
सोलापूर

21 वर्षीय सरपंच कोमल करपेंच्या कोरोनामुक्त पॅटर्नची मुख्यमंत्र्यांनी केले भरभरून कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अंत्रोळी गावच्या सरपंचाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

सरपंच कोमल करपे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या गावाची दखल घेतली ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची कौतुकाची थाप आम्हाला पुढील विकासकामासाठी उपयुक्त ठरणारी आहे.

दक्षिण सोलापूर : फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत अंत्रोळी येथील जिव्हाळा मतिमंद शाळेत एकाच वेळी 46 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले अन्‌ गावासह तालुका प्रशासनही हादरले. अशा कठीण परिस्थितीत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या 21व्या वर्षी सरपंचपदी विराजमान झालेल्या उच्चशिक्षित कोमल करपे (Sarpanch Komal Karpe) यांनी पदर खोचला अन्‌ गाव कोरोनामुक्त करण्यासाठीचा संकल्प सोडला अन्‌ तो प्रत्यक्षात उतरवला. त्यांच्या कार्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतली व रविवारी कोमल करपे यांचे कौतुकही केले. "माझ्या छोट्या गावाची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यापुढेही विकासाभिमुख कार्याद्वारे गावाचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न राहील', अशी प्रतिक्रिया अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील सरपंच कोमल करपे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. (Chief Minister Uddhav Thackeray praised the Sarpanch of Antroli village)

सुमारे 2 हजार 298 लोकवस्तीच्या या गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी "ट्रेसिंग - टेस्टिंग - ट्रीटमेंट' या त्रिसूत्रीचा सरपंच करपे यांनी आधार घेत अरोग्य विभागाच्या सहाय्याने काम सुरू केले. ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येकास मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंगबाबत गावातील तरुणांना सहभागी करून घेत कोरोनाबाबतची घरोघरी जनजागृती केली. कोरोना योद्धा समितीची स्थापना करत ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रचार व प्रसार केला. समजावून सांगतानाच मास्क न वापरणारे, शासन नियमांचा भंग करणारे यांच्यावर प्रसंगी कठोर होत दंडात्मक कारवाईही केली. कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून गाव कोरोनामुक्त झाले. थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गावाची दखल घेत सरपंच कोमल करपे यांचा आपल्या भाषणातून गौरव केला.

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने कायम गावाबाहेर असूनही गावाबद्दलची तळमळ व गावाच्या विकासासाठीची धडपड मनात असल्यामुळे डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोमल करपे यांनी सहभाग घेतला आणि निवडून येत थेट सरपंचपदी विराजमान झाल्या. वनस्पतिशास्त्रातील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सरपंच करपे यांनी लहान वयात गावाची धुरा हाती घेऊन उत्तम ठसा उमटवला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल व मे महिन्यात रौद्ररूप धारण केलेले असताना गावात सुमारे पंचवीसजण कोरोना पॉझिटिव्ह होते. ही संसर्ग साखळी तोडण्यासाठी सरपंच करपे यांनी उपसरपंच सोनाली खरात, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापू शेख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता नलावडे, अंत्रोळी उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सुनीता वारे, अरोग्य समुदाय अधिकारी डॉ. संकेत पुकाळे, आरोग्य सेवक प्रवीण टेकाळे, आशा वर्कर रंजना धेंडे, सविता शिंदे तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने ट्रेसिंग टेस्टिंग अन ट्रीटमेंट या त्रिसूत्रीसह माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा अवलंब करून गाव कोरोनामुक्त केले.

ठळक...

गावची लोकसंख्या सुमारे 2 हजार 298

ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब

45 वर्षावरील 300 लोकांचे लसीकरण पूर्ण

कोरोनामुक्तीसाठी कोव्हिड योद्धा समिती स्थापन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या गावाची दखल घेतली ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची कौतुकाची थाप आम्हाला पुढील विकासकामासाठी उपयुक्त ठरणारी आहे. आता या एकाच कामात न थांबता यापुढेही सतत गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा संकल्प केला आहे.

- कोमल करपे, सरपंच, अंत्रोळी

बातमीदार : श्‍याम जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT