chitra wagh 
सोलापूर

चित्रा वाघ म्हणाल्या, पिडितेला मिळावा महिन्यात न्याय 

प्रमोद बोडके

सोलापूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये महिला व युवतींवर अत्याचार करून त्यांना जाळण्याचा/मारण्याचा प्रकार झाला. यामध्ये महाराष्ट्राचा चेहरा जाळला गेला आहे. राज्यात सरकार कोणाचेही असो पिडितेला एका महिन्यात न्याय मिळावा. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात लढण्यासाठी वकिलांचा एक संच असावा अशी अपेक्षा भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. 
हेही वाचा - मोहोळमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने बारावीचा विद्यार्थी ठार 
सोलापुरातील अल्पवयीन पीडित मुलीची चौकशी करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्षा वाघ आज सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. पोलिस आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा केल्यानंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्षा वाघ म्हणाल्या, राज्यातील महिला व युवती सुरक्षित राहण्यासाठी काही उपाययोजना आवश्‍यक आहेत. त्या दृष्टीने मागण्यांचे निवेदन घेऊन आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत. 
हेही वाचा - बुलाती है...मगर जाने का नही...! 
राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधही वाघ यांनी केला. राज्याचे गृहमंत्री तेलंगणाच्या कायद्याचा अभ्यास करत आहेत. महाराष्ट्रात तसाच कायदा आणायचा त्यांचा विचार आहे. कायदा कोणताही आणावा त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे आवश्‍यक आहे. आपल्याकडे असलेल्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास नवीन कायद्यांची आवश्‍यकता भासणार नाही. राज्यात सत्तेवर कोण आहे? या पेक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही प्रदेश उपाध्यक्षा वाघ यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT