सोलापूर

कोरोना काळात चोखामेळानगर व दामाजीनगर संकटात

सकाळ वृत्तसेवा


मंगळवेढा(सोलापूर): तालुक्‍यात नव्याने झालेल्या चोखामेळा व दामाजीनगर ग्रामपंचायतीत कोरोना रोग प्रतिबंधासाठी नियुक्त समिती सदस्यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती काम करावे लागत आहे. 

चोखामेळानगर ग्रामपंचायतची लोकसंख्या सात हजार तर दामाजीनगर ग्रामपंचायतीची जवळपास 10 हजारांपर्यंत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रोगाचा अटकाव करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष मंगळवेढा सज्जाचे काम करणाऱ्या तलाठ्याकडे येथील दोन्ही ग्रामपंचायतींची जवळपास 17 हजार लोकसंख्येची जबाबदारी सोपवली आहे. दोन्ही ग्रामपंचायतींसाठी यापूर्वी तलाठी पद अस्तित्वात नाही. 

त्याप्रमाणे पोलिस पाटील पद अस्तित्वात नसल्याने येथील मल्लेवाडीच्या पोलिस पाटलावर या दोन ग्रामपंचायतींची जबाबदारी दिली. चोखामेळानगरच्या ग्रामसेवकाकडे अन्य दोन ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. दामाजीनगरच्या आरोग्यसेवकाकडे पाच मोठी गावे आहेत. सध्या तो रजेवर आहेत. 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या ग्रामपंचायतींतील उच्च प्रभागांत सध्या जास्त नागरिक आले. त्यामुळे येथील नागरिकांची तपासणी करण्याबरोबर कोण कधी, कोठून आले याची माहिती उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. परंतु, जबाबदारी अतिरिक्त कर्मचाऱ्यावर असल्याने त्यांना मूळ ठिकाणचे काम करून हे काम करताना दमछाक होत आहे. प्रसंगी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत या लोकवस्तीत बाहेरगावाहून आलेले नागरिक सहजासहजी समजत नाहीत. स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. 

होम टु होम सर्वे करावा 
कोरोना प्रतिबंधक ग्रामसमितीत या दोन्ही ग्रामपंचायतींची जबाबदारी अतिरिक्त कर्मचाऱ्यावर असल्याने त्यांची हे अतिरिक्त काम करताना दमछाक होत आहे. त्यामुळे शासनाने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून होम टू होम सर्व्हे करून तपासणी करावी. 
- सुहास पवार, उपसरपंच, चोखामेळानगर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT