Collector Milind Shambharkar
Collector Milind Shambharkar Sakal
सोलापूर

थर्टी फर्स्टला ज्येष्ठांनी व मुलांनी बाहेर जाणे टाळावे : जिल्हाधिकारी

प्रमोद बोडके,

सोलापूर : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढत आहे. 31 डिसेंबरनिमित्त 2021 ला निरोप व 2022 चे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी गुरुवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी शक्‍यतो घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.

नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्‍यतो घरीच साधेपणाने करावे. सध्या रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करावे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृह उपलब्ध आसन क्षमतेच्या पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत तर खुल्या जागेत उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्‍क्‍यांपर्यंत उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.

याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. मिरवणूक काढू नये अशी सूचना करण्यात आली आहे.

नूतन वर्षाच्या पहिल्यादिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिकस्थळी जातात. अशावेळी एकाच ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. फटाक्‍यांची आतिषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांच्या पालन करावे अशी सूचनाही शंभरकर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT