मंगळवेढा(सोलापूर) ः नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील 81 गावातील 36 हजार शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर 50 टक्के प्रमाणे 19 कोटी 98 लाखाचे अनुदान वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिल खात्याकडून देण्यात आली.
13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत क्षेत्र 15455.94 हेक्टर तर बाधित शेतकऱ्यांची संखा 20484 एवढी होती. तसेच 10283.74 हेक्टर बागायती क्षेत्रील बाधित शेतकऱ्यांची संख्या 12584 एवढी आहे. फळपिकाखालील बाधित क्षेत्र 5763.83 बाधीत शेतकरी 7751 आहेत. तालुक्यातील 40819 इतके शेतकरी बाधीत झाले.
तर 31503.51 बाधीत हेक्टरच्या नुकसानीपोटी 34 कोटी 76 लाख 79 हजार 822 एवढया रकमेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 60 टक्के म्हणजे 20 कोटी 96 लाख 64 हजार रक्कम आली. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तालुक्यातील महसूल, कृषी आणि ग्रामसेवक ही पदे रिक्त असताना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी 101 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून शासनाच्या हेक्टरी दहा हजार रुपये व फळबाग शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अशा पद्धतीने या याद्या तयार करण्यात आल्या परंतु याबाबतचे आदेश नसल्याने जुन्या शासन निर्णयाचा आधार घेऊन जिरायत शेतकऱ्यांना 6800, बागायत शेतकऱ्यांना 13500 व फळबाग शेतकऱ्यांना 18000 रुपये प्रमाणे याद्या तयार केल्या.
दरम्यान शासनाच्या सुधारित आदेश प्राप्त झाल्यामुळे नव्या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी वेगाने कार्यवाही केली. सध्या जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून 50 टक्के प्रमाणे रक्कम आणि दिवाळी सणाच्या तोंडावर प्रशासनाने अहोरात्र कष्ट करून कारखाना शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर वर्ग केले. दरम्यान प्रक्रिया सुरू असताना अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित झालेला फटका देखील बसला. तरीही प्रशासनाने गतीने प्रक्रिया राबविली.
दिवाळीमुळे तातडीने अनुदान केले जमा
बाधित शेतकऱ्यांचा दिवाळी सण आनंदात होण्यासाठी कृषी,महसूल,पंचायत समितीच्या सहकार्याने अनुदानाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केले.
- स्वप्नील रावडे तहसीलदार
शासनाची मदत मोलाची
अतिवृष्टीच्या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांचे पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे सूचना प्रशासनाला दिली होती, प्रशासनाने ही प्रक्रिया चोखपणे बजावली. शासनाने अनुदान देखील तात्काळ जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे लवकर मिळणार आहेत
- आ. भारत भालके,पंढरपूर मंगळवेढा
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.