Hinsachar 
सोलापूर

सांगोल्यात विवाहितेचा छळ; नवरा, सासू, सासरा व दिरांविरुद्ध तक्रार

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : लग्नात तुझ्या माहेरच्यांनी आमचा काही योग्य तो मानपान केला नाही, यासह जमीन खरेदी करण्यासाठी वेळोवेळी माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करणे व मारहाण करून माहेरी घालवून पुन्हा नांदण्यास नेले नाही म्हणून खिलारवाडी (ता. सांगोला) येथील विवाहितेने नवरा, सासू, सासरा व दिरांवर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

फिर्यादी विवाहितेचे 7 जुलै 2016 रोजी खिलारवाडी (ता. सांगोला) येथील उदय भीमराव खिलारे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नात नऊ तोळे सोन्याचे दागिने व इतर प्रापंचिक साहित्यही देण्यात आले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी, तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये आमचा काही योग्य तो मान पण केला नाही, आम्हास जमीन घ्यायची आहे तेव्हा तू वडिलांकडून चार लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस सासरच्या व्यक्तींकडून त्रास दिला जात होता. या वेळी विवाहितेच्या वडिलांनी चार लाख रुपये दिले. त्यानंतरही विवाहितेच्या वडिलांनी आणखी दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये दिले. परंतु विवाहितेस वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मारहाण व त्रास दिला जात होता. 

डिसेंबर 2019 मध्ये मारहाण करून नवऱ्याने विवाहितेस माहेरी आई-वडिलांकडे हाकलून दिले. तेव्हापासून विवाहितेस नांदण्यासाठी नेण्यात आले नाही. 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी एक वाजता वडिलांसोबत पीडित विवाहित महिला सासरच्या घरी गेली असता विवाहितेचा नवरा उदय भीमराव खिलारे, सासू मालन भीमराव खिलारे, सासरे भीमराव गजेंद्र खिलारे, दीर जनक भीमराव खिलारे व योगीराज भीमराव खिलारे (सर्व रा. खिलारवाडी, ता. सांगोला) यांनी पुन्हा नांदण्यास घेतले नाही. मारहाण, माहेरून पुन्हा नांदणेस नेले नाही, नवऱ्याने दुसरे लग्न केले असल्याची माहिती तसेच शिवीगाळ, दमदाटी केल्याची फिर्याद विवाहितेने नवरा, सासू, सासरा व दिरांविरुद्ध तक्रार केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT