Complaint for theft of a girlfriend in Sangola 
सोलापूर

मैत्रिणीची चोरी केल्याची फिर्याद 

सकाळ वृत्तसेवा

सांगोला (सोलापूर) : उसने पैसे मागण्यासाठी आलेल्या मैत्रिणीनेच घरातील 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल व तीन हजार रुपये चोरून नेल्याची घटना सांगोल्यात घडली आहे. याबाबत सुगंधा विकास भजनावळे (वय 24, रा. मिरज रोड, शिवाजीनगर, सांगोला) हिने आपली मैत्रीण काजल सखाराम बनसोडे (रा. भीमनगर, ता. सांगोला) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत हकीकत अशी की, सुगंधा भजनावळे येथे राहण्यास असून श्री हॉस्पिटलमध्ये नर्सची खासगी नोकरी करते. 22 जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास सुगंधाची मैत्रीण काजल बनसोडे ही उसनवार पैसे मागण्यासाठी आली होती. या वेळी सुगंधाने सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. मी माझ्या भावास पैशाबाबत विचारून तुला कळवते, असे सांगितले. या वेळीच सुगंधाच्या घराबाहेर नळाला पाणी आल्याने ती पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडली. परंतु सुगंधाची मैत्रीण घरातच बसून होती. या वेळी घरातील भांड्याच्या रॅकवर ठेवलेला 12 हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल व पॉकेटमध्ये ठेवलेले तीन हजार रुपये मैत्रिणीनेच घरातून गुपचूप माझ्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून घेऊन निघून गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

SCROLL FOR NEXT