gasrepair.jpg 
सोलापूर

घरच्यांचे हाल सहन होत नाहीत म्हणून....

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: रस्त्यावरचा माल असला तर कसाही विकला जाईल. पण लोकांच्या घरासमोर जाऊन कुकर अन्‌ गॅस दुरुस्तीचे काम कोणी द्यायला तयार नाही. लॉकडाउनमधील कमाईचे हाल या आधी कधी पाहिले नाहीत, अशी भावना दुर्गास्वामी वरगंटे यांनी व्यक्त केली. 

वैद्यवाडीच्या भागात राहणारे दुर्गास्वामी मागील 20 वर्षांपासून व्यवसाय करतात. सायकलला दोन पिशव्यांत दुरुस्तीचे सामान घेऊन ते फिरत असतात. गॅसची दुरुस्ती करणे, गॅस स्वच्छ करणे, गॅस शेगडीतील कचरा काढणे, कुकरला रिंग बसवणे, शिट्टी दुरुस्त करून देणे यासह अनेक दुरुस्तीची कामे ते करतात. त्यातून त्यांना बरी कमाई देखील होते. मात्र, आता दोन महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने त्यांच्या व्यवसायाची वाताहत झाली. घराबाहेर पडण्याची आजाराच्या जोराने हिंमत झाली नाही. 
मागील दोन महिन्यांपासून ते घरी बसूनच होते. रेशन दुकानदाराने दोन महिन्यांत एकदा 15 किलो गहू दिले. दुसरे काहीही धान्य मिळाले नाही. दोन महिन्यांत जवळ असलेली होती नव्हती कमाई खर्च झाली. घरात पत्नी, तीन मुले व एक मुलगी यांचा सर्वांचा घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुले शिक्षण घेत आहेत. त्यांचे शिक्षण चांगले होण्यासाठी काही ना काही करणे भागच होते. सर्वच जण घरी बसून राहिले तर घरखर्चाचे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. 

हेही वाचाः सावरकरांच्या अष्टपैलू व्यक्तित्वांमुळे समाजाची घडण 

आता घरी बसून संसाराचा गाडा चालणारच नाही म्हणून दोन दिवसांपासून ते सायकलवर कामासाठी फिरत आहेत. कोरोना आजाराच्या भीतीने ग्राहक घरी दुरुस्ती कामाला बोलवतच नाहीत. सगळीकडे शहरात सर्वत्र फिरून अगदी 50 रुपये देखील मिळत नाहीत. आता या स्थितीत काय करावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कमी उत्पन्नाचे पिवळे रेशन कार्ड देण्याऐवजी त्यांना केशरी कार्ड दिले असल्याने पुरेसे धान्य मिळाले नाही. पण आता घरी राहवत नाही अन्‌ घरच्यांची अडचण सहन होत नाही. त्यामुळे हिंमत करून घराबाहेर कामाच्या शोधात पडल्याचे ते सांगतात.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT