सोलापूर

काँग्रेस शहराध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना आव्हान! PM केअर फंड, राफेलचीही ईडीने करावी चौकशी

शहराध्यक्ष वाले म्हणाले, ज्या गांधी परीवाराने देशासाठी बलिदान दिले, त्या परिवारातील काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधींना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची नोटीस पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. चौकशीच्या नावाखाली तीन दिवस राहुल गांधींचा छळ केला. मोदी सरकारची ही दडपशाही काँग्रेसचा कार्यकर्ता सहन करणारा नाही. ईडी खरोखरच काम करत असेल, तर किरीट सोमय्या व भाजपवाल्यांनी अनेक नेत्यांवरील आरोपांचीही चौकशी करावी.

तात्या लांडगे

सोलापूर : देशाला सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी परिवाराला अडचणीत आणण्यासाठी मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत आहे. त्याविरोधात शुक्रवारी (ता. १७) शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ईडी व मोदी सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न या आंदोलनावेळी केला. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘मोदी सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’, ‘नही चलेगी, नहीं चलेगी, मोदी 'तेरी हिटलरशाही नही चलेगी’, ईडी व तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा, ईडीचा पोपट म्हणून उपयोग करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, राहुलजी गांधी तुम संघर्ष करो- हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी शहराध्यक्ष वाले, माजी आमदार निर्मला ठोकळ, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी गटनेते चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, दादासाहेब साठे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, मनीष गडदे, माजी महापौर अलका राठोड, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, शिवलिंग बाटलीवाला, अनुराधा काटकर, भिमाशंकर जमादार, अर्जुनराव पाटील, सुधीर लांडे, युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, शहराध्यक्ष गणेश डोंगरे, भीमराव बाळगे, तालुकाध्यक्ष शालिवाहन माने-देशमुख, उमेश सुरते, अंबादास करगुळे, केशव इंगळे, तिरुपती परकीपंडला, अशोक देवकते आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले...
‘ज्या गांधी परीवाराने देशासाठी बलिदान दिले, त्या परिवारातील काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधींना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची नोटीस पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. चौकशीच्या नावाखाली तीन दिवस राहुल गांधींचा छळ केला. मोदी सरकारची ही दडपशाही काँग्रेसचा कार्यकर्ता सहन करणारा नाही. ईडी खरोखरच काम करत असेल, तर किरीट सोमय्या व भाजपवाल्यांनी अनेक नेत्यांवरील आरोपांचीही चौकशी करावी. देशभरात भाजपचे हजारो कोटींचे ऑफिस निर्माण केले. त्यासाठी पैसा कुठून आला, पीएम केअर फंड व राफेलच्या दलालीची देखील ईडीतर्फे चौकशी करावी’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT