सोलापूर

भाजीपाला नासाडी टाळण्यासाठी निर्जलीकरण सयंत्र

सकाळ वृत्तसेवा

वैराग(सोलापूर) : कोरोना या विषाणूचा आर्थिक फटका फळे-भाजीपाला पिकांना बसला आहे. फळे-भाजीपाल्याची नासाडी रोखण्यासाठी 
यावली (ता. बार्शी) येथे निर्जलीकरण सयंत्र निर्मिती करून महिलांनी नाशवंत होणाऱ्या फळे-भाजीपाल्याची नासाडी रोखली आहे. 
उपलब्ध साधनाचा वापर करून तीन टप्प्यांचे हे सयंत्र तयार केले आहे. 

फळे व भाजीपाला हे नाशवंत गुणधर्म असल्यामुळे त्यांची नासाडी होते. त्यामध्ये शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होते. ठराविक हंगामामध्ये मिळणारी कृषी उत्पादने बाजारपेठेत एकदम आल्यास दर पडून मातीमोल किमतीला विकली जातात किंवा ती फेकून दिली जातात. अशावेळी उपलब्ध मालावर प्रक्रिया करून साठवणुकीचा कालावधी वाढविल्यास त्या कृषी उत्पादनाची मूल्यवृद्धी करता येते. 

यासाठी फळे व भाजीपाला साठवणुकीचा कालावधी वाढविण्यासाठी सुकविणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. आजच्या परिस्थितीत सुकवण्याची ही पद्धत घरगुती स्तरावर न राहता त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. तांत्रिक पद्धतीने भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून त्याचा साठा व साठवण कालावधी वाढविता येतो. ठराविक हंगामामध्ये मिळणारी फळे व भाजीपाला प्रक्रिया केल्यामुळे त्यांची मूल्यवृद्धी केल्या कारणाने योग्य वेळी विक्री करून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळवता येते. 
या सर्व बाबींचा विचार करून कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, युनायटेड वे मुंबई व जॉन डियर प्र. ई. ली यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंजीवनी प्रकल्पांतर्गत प्रकल्प अधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून स्थानिक गावपातळीवर उपलब्ध साधनांचा वापर करून अल्प खर्चात हे निर्जलीकरण सयंत्र येथील शेतकरी वैजिनाथ सरोदे यांच्या शेतात तयार करण्यात आले. 
या गावात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेण्यात येते. मात्र कांद्यास बाजारभाव कमी मिळत आहे. उत्पादन खर्चाला लागलेली किंमत पण मिळत नाही व घरी साठवून ठेवणे पण अशक्‍य असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कांदा विक्री करावा लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी हे निर्जलीकरण सयंत्र तयार करण्यात आले. शेतकरी वर्गास प्रशिक्षित करण्याचे कार्य राहुल पाटील यांच्या वतीने करण्यात आले. या वेळी अतुल शिंदे, वासुदेव नवले, वैजिनाथ सरोदे, मैना सरोदे व स्वाती सरोदे हे शेतकरी उपस्थित होते. तर प्रकल्प अधिकारी राहुल पाटील यांनी याविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळांचे धाबे दणाणले! परीक्षा सुरु असताना एकाचवेळी होणार सर्व शाळांमधील पटपडताळणी; शिक्षण संचालकांचे आदेश; पटसंख्येतील शाळांची बनवेगिरी उघड होणार

Crunchy Makhana Chaat: सकाळी फक्त ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत माखाना चाट; आंबट-तिखट चवीसह हेल्दी नाश्त्याचा संपूर्ण धमाका!

आजचे राशिभविष्य - 03 एप्रिल 2026

Panchang : आजचे पंचांग 3 एप्रिल 2026! शुक्रवारचा शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

डोकेदुखी

SCROLL FOR NEXT