Nature 
सोलापूर

ग्रामीण भागातील श्रावणावर कोरोनाचे सावट; पण सकारात्मक राहून घेता येईल आध्यात्मिक व नैसर्गिक आनंद ! 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना, पावसात मनसोक्त भिजत, निसर्गाच्या सान्निध्यात फिरत आनंद घेण्याचा महिना. यंदा यावर कोरोनाचे सावट असले तरी सकारात्मक विचार करून, योग्य नियोजन करून आध्यात्मिक व नैसर्गिक आनंद घेता येईल, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. 

श्रावण महिन्यात सर्वजण विशेषतः महिला व्रतवैकल्ये करतात. सोमवारी श्री महादेवाच्या मंदिरात दर्शनाला रांग लागलेली असते. नागपंचमीच्या आधीपासून परिसरातील महिला, मुली एकत्र येत फेर धरणे, झोके खेळणे असे विविध खेळ खेळतात. अनेक ठिकाणी असलेल्या श्री महादेव मंदिरांच्या परिसराला तर यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जाऊन राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी तर धूमधडाक्‍यात साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी हे सर्व सण साजरे करताना मर्यादा पडणार असल्या तरी सर्व कुटुंबीय घरातच एकत्र येऊन हे सण आनंदात उत्साहात साजरे करू शकतात. 

श्रावण महिन्यात पावसात भिजत डोंगरदऱ्यात फिरण्याकडे तरुणांचा ओढा असतो. उंचावरून पडणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याची मजा काही औरच असते. दरवर्षी तरुणाई श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहात असते. मस्त पावसात भिजत फिरल्यानंतर कडकडीत भूक लागते. त्या वेळी गरम भाकरी, पिठले, ठेचा, भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा, विस्तवावर भाजलेले मक्‍याचे कणीस मिळाले तर आनंद गगनात मावेनासा होतो. या सर्व खाद्य पदार्थांवर उभा-आडवा हात मारला जातो. परंतु, यंदा या सर्वांवर देखील मर्यादा आल्या आहेत. परंतु सकारात्मक विचार करत जर आपल्या घराजवळील एखाद्या शेतात, निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत खाद्यपदार्थ तयार करून नेले तर आस्वाद घेता येईल. 

कुर्डुवाडीची रहिवासी मयूर पाटील म्हणाले, मी दरवर्षी श्रावण महिन्यात पुणे, सातारा, कोल्हापूर, रामलिंग, सौताडा यापैकी किमान एका ठिकाणी तरी मित्रांसमवेत डोंगरदऱ्यात फिरावयास जातोच. परंतु, सध्या इतर जिल्ह्यांत फिरावयास जाणे मला शक्‍य वाटत नाही. शेतात जाऊन पावसाच्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतोय. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT