The corona breaks the signal system 
सोलापूर

'कोरोना'मुळे सिग्नल यंत्रणेला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 52 वर पोहचली असून कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वोतोपरी ठोस उपाय केले जात आहेत. वाहनांची व नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून आता सोलापूरसह औरंगाबाद, यवतमाळ, पुणे, मुंबई, नागपूर, नगर, रायगड, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 20) पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी सोलापूर शहरातील सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेतला. 

राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांवरील वाहनधारकांना सिग्नल यंत्रणेमुळे काही मिनिटे एकाच ठिकाणी थांबून राहावे लागत होते. त्यामुळे वाहनाधारकांमध्ये भितीचे वातावरण होते. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत पोलिस आयुक्‍तांनी सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता वाहनचालकांना विनाथांबा वाहन चालविता येणार असून पोलिस आयुक्‍तांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. परंतु, वाहनचालकांनी या कालावधीत स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

अपघात होणार नाही याची दक्षता घ्या
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या भितीने रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी झाली असून वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी काही कालावधीसाठी शहरातील सिग्नल यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे. परिस्थिती बदलल्यानंतर सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरु होईल. वाहनचालकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

  • ठळक बाबी... 
  • - रस्त्यांवरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी आता सिग्नल यंत्रणा बंद 
  • - कोरोनामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी झाली कमी : वाहतूक पोलिसांना आराम 
  • - रिक्षाचालकांसह खासगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला खरबदारीच्या सूचना 
  • - एसटी बस, सिटी बस, खासगी रिक्षांमध्ये सॅनिटरी लिक्‍विड ठेवण्याची सक्‍ती  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Health Ranking : आरोग्याच्या गुणानुक्रमात बीड जिल्हा राज्यात नंबर वन; एचएमआयएस अहवालात तब्बल ९० गुणांसह अव्वल

Kartiki Wari Women Safety : महिला सुरक्षेसाठी आळंदीत पोलिसांची खबरदारी; धर्मशाळा, मंगल कार्यालयांत सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन

शुक्राच्या कृपेने ७ राशींचं नशीब चमकणार! पुढील २३७ दिवसांत पैशांचा पाऊस; बँक बॅलन्स वाढणार

PCMC Hawkers Zone : पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला मिळणार नियोजनबद्ध जागा; स्मार्ट हॉकर संकल्पनेतून महापालिकेचे नवे नियोजन

Pune News : मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालावा - काँग्रेस

SCROLL FOR NEXT