सोलापूर

या जिल्ह्यात सेवानिवृत्तांच्या निवृत्तीवेतनावर कोरोनाचे संकट? 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः लॉकडाऊनमुळे सेवानिवृत्त कर्मचारी आयुष्यभर कष्ट करून कमावलेल्या पुंजीपासून वंचित राहिले आहेत. निवृत्तीवेतनही वेळेवर होण्याची शक्‍यता नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरसोय आणि कुचंबनेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने तात्पुरते निवृत्तीवेतन/उपदान मंजूर करण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. 

शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतननिश्‍चितीची वेतन पडताळणीसाठी अर्थ विभागाकडे प्रलंबित आहेत. कोरोना/कोव्हीड-19 संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती मर्यादित करण्यात आली आहे. परिणामी निवृत्तीवेतन प्रकरणे वेतनपडताळणी आणि निवृत्तीवेतनाचे प्राधिकारपत्राचे निर्गमन या बाबींसाठी विलंब होत आहे. या पार्श्‍वभूमीवर निवृत्तीवेतन प्रकरणे अंतिम होण्यास विलंब होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील 126 नुसार कार्यालय प्रमुखांना सहा महिने इतक्‍या कालावधीकरिता तात्पुरते निवृत्तीवेतन मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे अशा सर्व प्रकरणी कार्यालय प्रमुखांनी तात्पुरते निवृत्तीवेतन/उपदान तातडीने मंजूर करावे आणि सध्याची आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात येऊन शासकीय कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अशी निवृत्तीवेतन प्रकरणे जलदगतीने अंतिम करण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT