ganeshostav.jpg 
सोलापूर

कोरोना इफेक्‍ट : गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांचा परवाना काढण्याचा उत्साह झाला कमी 

राजाराम माने

केतूर (सोलापूर)ः गणरायाचे आगमन शनिवार (ता. 22) रोजी होत आहे मात्र देशभर पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे दरवर्षी दिसणारा गणेश आगमनाचा उत्साह मात्र यावर्षी कमी प्रमाणात दिसून येत आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी बाजारपेठेतील उलाढालही मंदावली आहे. यावर्षी गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असतानाही परवाना काढण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसत नाही. 

कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच उत्सव व सणावर पाणी फेरले गेले आहे.त्यात गणेशोत्सवही अपवाद राहिलेला नाही.देशात व राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने याचे सावट गणेशोत्सवरही दिसून येत आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा शासनाच्या आदेशाप्रमाणे मोठ्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल नसल्याने मूर्तिकार ही संकटात सापडले आहेत.तसेच यावर्षी सामाजिक देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई, हलते देखावे यांनाही "ब्रेक" बसला आहे. 
करमाळा तालुक्‍यात दरवर्षी गणेशोत्सव मंडळांची गणेशोत्सवासाठी लागणारे परवाने काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत असे त्यामुळे शासनाकडे महसूलही जमा होत असे. यावर्षी गणेशोत्सव 2/3 दिवसावर येऊन ठेपला असतानाही परवाना काढण्यासाठी सर्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसत नाही. एकूणच परवान्यासाठी गणेशोत्सव मंडळाचा प्रतिसाद अत्यल्प आहे.आज अखेर पर्यंत तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील फक्त एकाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने परवान्यासाठी अर्ज दिल्याचे समजत आहे.यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर मंडळाचा भर असल्याने परवान्यासाठी गर्दी कमी असल्याची दिसन आहे.एकूणच परिस्थिती पाहता शहरासह ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सव करण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याचेच दिसून येत आहे. 
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : FASTag वार्षिक पास आता महागला! १ एप्रिलपासून अंमलबजावणी

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT