Corona1 
सोलापूर

माळशिरसच्या "या' भागातही केली कोरोनाने एंट्री 

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील पश्‍चिम भागात कोरोनाने प्रवेश केला. शिंदेवाडी (ता. माळशिरस) येथून एक तरुण पुणे येथे जाऊन आला होता. पुण्यात गेल्यानंतर तो कोरोना बाधित निघाला आहे. त्याच्या सहवासात आलेल्या 15 जणांना आरोग्य खात्याने 4 तारखेला विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यापैकी एकचा रिपोर्ट गुरुवार (ता. 9) रात्री पॉझिटिव्ह आला आहे. 25 वर्षांचा हा तरुण पॉझिटिव्ह आला असून इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

महाळुंग येथील कोरोना केअर सेंटरमध्ये तालुक्‍यातील दोन व इतर जिल्ह्यांतून आलेले दोन असे एकूण चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. 51 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी अद्याप पाच रिपोर्ट येणे प्रलंबित आहेत. यापूर्वी तालुक्‍याच्या पूर्व भागात सहा रुग्ण होते; मात्र पश्‍चिम भागात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आजच्या रिपोर्टमुळे पश्‍चिम भागातही कोरोनाने प्रवेश केला आहे. 

नातेपुतेची बाजारपेठ मोठी असल्याने पंचक्रोशीतील हजारो नागरिक दररोज येथे खरेदीला येत असतात, हे लक्षात घेऊन नातेपुते ग्रामपंचायतीने आजपासून 10, 11 आणि 12 असा तीन दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. वैद्यकीय सेवा वगळता नातेपुते येथील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. पोलिस खात्यानेही कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील जनतेने आरोग्य खात्यास चांगले सहकार्य केले आहे. सर्वांनी दक्षता पाळून बाहेर गावाहून आलेल्या लोकांची त्वरित माहिती द्यावी व सरकारी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis New Rule Taxi : प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला देवेंद्र फडणवीसांची केराची टोपली; रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

IND vs SL, 2nd Test : मोहम्मद सिराजला कोलंबो कसोटीत दुखापत होती का? अखेर कर्णधार शुभमन गिलनेच केला खुलासा

Gold Rate Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! बहिणीसाठी दागिना घेण्याची सुवर्णसंधी? पाहा आजचा ताजा भाव

Marathi News Live Updates : गोकुळ निवडणुकीची मोठी अपडेट : कच्च्या मतदार यादीवरील उर्वरित ३१० हरकतींवर आज अंतिम सुनावणी; ३१ ऑगस्टला निकाल!

Amravati Hospital: बेड नाहीत म्हणून जमिनीवर उपचार! अमरावतीच्या इर्विन रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर..

SCROLL FOR NEXT