सोलापूर

या चार तालुक्यात सहा तासांची स्थितीलता

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर शहराच्या लगत असलेले मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी या चारही तालुक्याच्या हद्दी 3 मे पर्यंत बंद करण्याचा व या तालुक्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज घेतला आहे. तीन मेपर्यंत या निर्णयाची ही अंमलबजावणी होणार असून या कालावधीत या तालुक्यातील नागरिकांना सहा तासाची शिथीलता देण्यात आली आहे.

या चारही तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकाने नियमित वेळेत चालू राहणार आहेत. इतर किराणामाल, बेकरी, फळे, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री व वितरण करणारी यंत्रणा व दुकाने, अंडी, मांस, मासे, इत्यादीची दुकाने सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत सुरू राहणार आहेत. खते, कीटकनाशके, बी - बियाणे विक्री इत्यादी बाबींची दुकाने / आस्थापना कृषीसाठी लागणारी यंत्राची दुकाने, त्यासाठीचे आवश्यक सुटे भाग व त्यांचा पुरवठा करणारी, दुरुस्ती करणारी दुकाने सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप सकाळी सहा ते 12 या वेळेत सुरू राहतील तथापि ऍम्ब्युलन्स, डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने तसेच महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, अग्निशमन, विद्युत पुरवठा इत्यादी विभागाच्या वाहनांसाठी नियमित वेळेनुसार पेट्रोल पंप चालू राहणार आहेत.

शिव भोजन केंद्र नियमित वेळेनुसार चालू ठेवण्यात येणार आहे. या चार तालुक्यातील सर्व बँकांमधील कामकाजाची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन ही निश्चित करण्यात आली असून याकामी बँकांचे एटीएम व संलग्न सेवा रोकड वाहतुकीच्या सेवा देणाऱ्या कंपन्या इत्यादी आस्थापनांनी कमीतकमी मनुष्य बळाचा वापर करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या आहेत. या चार तालुक्यामधील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील फळे व भाजीपाला लिलाव बंद राहणार आहेत. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारे खासगी, सरकारी रुग्णालय, दवाखाने आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेची संबंधित कर्मचारी व त्यांची वाहने, ऍम्बुलन्स सेवा तसेच एसएआरआय व आयएलआय व कॉन्टॅक्ट ट्रेकिंग या संदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी कर्मचारी यांना या आदेशातून सुट देण्यात आली आहे. रुग्णालयांमध्ये व दवाखान्याच्या संलग्न असणारी औषधाची दुकाने व अनुषंगिक वैद्यकीय उपकरणे इत्यादींची दुकाने नियमितपणे चालू राहतील. तथापि सदर दुकाने अस्थापना यांना नियमित वेळेत शिवाय चोवीस तास व आठवड्यातील सातही दिवस दुकाने चालू ठेवण्यास देखील मुभा देण्यात आली आहे.

या उद्योगांना दिलासा
जीवनावश्यक सेवेतील यामध्ये औषधे व वैद्यकीय उपकरणे तसेच तेल व गॅस उत्पादन, वितरण करणारे कारखाने व आस्थापना तसेच या उद्योगात स्थानिक रहिवासी असलेल्या कामगारांचा (insitu) समावेश आहे असे उद्योग त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 17 एप्रिल 2020 रोजी परत पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या किंवा चालू होणाऱ्या उद्योगधंद्यांना हा आदेश लागू राहणार नाही. मात्र सदर कारखान्यांनी (insitu) कामगारांमार्फत काम करावे. सोशल डिस्टन्सचे कडक पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 


सोलापूर शहरा शेजारी असलेल्या मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या चार तालुक्यांसाठीच हा आदेश काढण्यात आला आहे. सोलापूर शहरासाठी (पोलीस आयुक्तालय हद्द) पोलीस आयुक्तांनी काढलेला आदेश लागू असणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सात तालुक्यांसाठी (मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे चार तालुके वगळून) यापूर्वी काढलेले आदेश लागू असणार आहेत. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT