Corona 
सोलापूर

करमाळ्यात कोरोनाची पॉवर होतेय कमी ! मात्र आगामी सणांमध्ये घ्यावी लागणार खबरदारी 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या सुरवातीला झपाट्याने वाढत होती. परंतु सध्या गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात कोरोनाची "पॉवर' कमी होत असल्याची समाधानाची व दिलासादायक बाब दिसून येत आहे. 

तालुक्‍याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वरचेवर वाढतच चालला होता. मात्र येथेही गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याने रुग्णसंख्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. 

तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य विभागाला मात्र दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या 2057 असून, त्यापैकी 1880 जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. तर कोव्हिड सेंटरमध्ये 149 रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण कोरोना बाधितांची संख्या वरचेवर कमी होत असल्यामुळे नागरिकांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

याबाबत करमाळ्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे म्हणाले, तालुक्‍यातील आरोग्य कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोना आटोक्‍यात आला आहे. आगामी दसरा, दिवाळी या सणांच्या काळात लोकांचा संपर्क वाढून कोरोना संसर्ग वाढण्याची जास्त शक्‍यता आहे. याबाबत नागरिकांनी खबरदारी म्हणून "मास्क वापरा व कोरोना पळवा' हेच ध्येय ठेवावे. तालुक्‍यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरी लगेच निर्धास्त होणे गरजेचे नाही; कारण अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे. काळजी घेतली नाही तर तो पुन्हा वाढण्याचा धोका आहेच. 

करमाळ्याचे तहसीलदार समीर माने म्हणाले, अनलॉक - 5 अनुसार राज्यात जवळजवळ सर्व व्यवहार, व्यवसाय सुरू झाले आहेत. तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच लक्षणे दिसताच आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. 

करमाळ्याचे विशाल घोलप म्हणाले, कोरोना यंत्रणेला सामाजिक क्षेत्राचे योगदान मिळाल्यास या संकटाचा मुकाबला करता येणार आहे. सर्वांनीच याकडे एक सामाजिक लढा म्हणून पाहणे गरजेचे आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Search : काय तुमची नवीन APAAR ID तयार झालीये? Whatsapp वरचा नवा Scam गुगलवर का होतोय ट्रेंड..पाहा एका क्लिकवर

Crime: पतीने गिफ्टमध्ये दुचाकी दिली; तीच घेऊन पत्नीने दुसऱ्यासोबत पळ काढला, द्वेषामुळे तरुण ‘ॲक्टिव्हा किंग चोर’ बनला

तरुणाईची झिंग पडलेली महागात! प्राजक्ता शुक्रेच्या भरधाव गाडीने दोन जणांना उडवलं अन्... मुंबईतला तो भयानक अपघात

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेत MIMच्या गटनेते पदी विजय तातोबा उबाळे यांची केली नियुक्ती

Nashik News : नाशिककरांना कचरा विलगीकरण बंधनकारक! नियम मोडणाऱ्यांकडून १० लाखांचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT