corona
corona 
सोलापूर

सोलापूर शहर, जिल्ह्यात कोरोनाने घेतला 18 जणांचा बळी, बाधितांची संख्या 29 हजार 309 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे मयत होण्याचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. बाधितांची संख्या वाढल्याने मयत झालेल्या व्यक्तींचा टक्का कमी झाला असला तरीही कोरोनामुळे बळी जाण्याचे प्रमाण आजही पूर्वी प्रमाणेच कायम आहे. ग्रामीण भागातील 15 तर महापालिका हद्दीतील 3 अशा एकूण 18 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे आजच्या अहवालानूसार स्पष्ट झाले आहे. 

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 47 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 587 तर महापालिका हद्दीतील 460 रुग्णांचा समावेश आहे. आज ग्रामीण भागात 472 तर महापालिका हद्दीत 51 असे एकूण 523 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. एकूण बाधितांची संख्या आता 29 हजार 309 झाली आहे. त्यापैकी 20 हजार 462 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रुग्णालयात सध्या 7 हजार 800 जणांवर उपचार सुरु आहेत. 
ग्रामीण भागातील 6 हजार 867 तर महापालिका हद्दीतील 933 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोना चाचणीचे 91 अहवाल प्रलंबित आहेत. सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. आजच्या अहालानूसार 564 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 531 तर महापालिका हद्दीतील 33 जणांचा समावेश आहे. शहर व जिल्ह्यातील 2 लाख 8 हजार 113 कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT