Teachers Esakal
सोलापूर

ऑन ड्यूटी शिक्षकांवर कोरोनाचा घाव ! शहरात 29 शिक्षक कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू

शहरातील ऑन ड्यूटी शिक्षक कोरोना बाधित होत असून तिघा शिक्षकांचा मृत्यू झाला आहे

अरविंद मोटे

सोलापूर : कोरोनाविषयक कामकाजावर ऑन ड्यूटी असलेल्या तब्बल 29 शिक्षक, शिक्षकेतर (Corona on duty Teachers) कर्मचाऱ्यांवर कोरोनाने घाव घातला आहे, तर तिघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Corona On-duty teachers in the city is coming corona infected and three teachers have died)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत कोरोना ड्यूटी चोखपणे बजावली. पुन्हा दुसऱ्या लाटेत 30 मार्च 2021 पासून शिक्षकांना फळा- खडू अन्‌ छडी ऐवजी ट्रेम्प्रेचर चेकिंग मशिन आणि पल्स ऑक्‍सिमीटर घेऊन कोरोना ड्यूटीवर तैनात व्हावे लागले. शहरात महापालिका शाळा आणि खासगी शाळेतील मिळून 981 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सध्या कोरोना ड्यूटीवर आहेत. रमजान सणामुळे रजा घेतलेले आणखी 101 शिक्षक शनिवारपासून या सेवेत दाखल होतील. म्हणजेच 1 हजार 82 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोरोना ड्यूटी बजावत आहेत.

शहर परिसरातील कोरोनाबाधितांचे कॉन्टक्‍ट ट्रेसिंग, सर्व्हे, कोव्हिड कंट्रोल रूममधील काम, ऍम्ब्युलन्सचे नियोजन, क्वारंटाईन सेंटरमधील सेवा, लसीकरण केंद्रावरील सेवा अशी कामे या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. मोठ्या धाडसाने ही सेवा बजाविणारे शिक्षक व कर्मचारी कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. या दुसऱ्या लाटेत शहरातील 29 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे.

या तिघांचा मृत्यू

  • शिक्षिका वासंती गंगणे (सम्राट अशोक प्राथमिक शाळा, सोलापूर, नेमणूक : सोरेगाव नागरी आरोग्य केंद्र)

  • शिक्षक सुनील खंडाळकर (सुशील मराठी प्राथमिक शाळा सोलापूर, नेमणूक : रामवाडी नागरी आरोग्य केंद्र)

  • पर्यवेक्षक बसवराज गुरगुरे (छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा, सोलापूर, नेमणूक : मुद्रा सन सिटी नागरी आरोग्य केंद्र

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टर्स, आरोग्य सेवक, पोलिस यांच्याप्रमाणेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही फ्रंटलाइनवर काम करीत आहेत. महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी कायम उभे आहे. जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित झाले, त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात येत आहेत. त्या प्रत्येकाशी दररोज फोनवरून संपर्क साधून प्रकृतीचा आढावा घेतला जात आहे. मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी आयुक्तांना पत्र दिले असून, शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.

- कादर शेख, प्रशासनाधिकारी, सोलापूर महापालिका

कोरोना ड्यूटीवर असलेल्या शिक्षकांना विविध हॉस्पिटल्समध्ये राखीव बेड्‌स असावेत. काही सामाजिक संस्थांनी याकामी पुढाकार घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या सर्व शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण जलद गतीने पूर्ण केले जावे. डॉक्‍टर्स आणि पोलिसांप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले जावे. कोरोना ड्यूटीवर मृत्यू झालेल्या शिक्षकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा. महापालिका प्रशासनाचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहेच. वरील मागण्या मान्य झाल्यास शिक्षक, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- सुनील चव्हाण, प्रदेश सचिव, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT